पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मूत्राशय मूत्रपिंडातून येणारी नळी वीर्यकोश पुरुषबीजवाहिनी मूत्रमार्ग पूरस्थ ग्रंथी (प्रोस्टेट ग्लैंड) शिस्न/लिंग कोपरग्रंथी गुदद्वार एपिडिडिमीस वृषण शिस्नमुंड लिंगातून पुरुषबीजं व वीर्य बाहेर सोडलं जातं.
मूत्राशय : दोन मूत्रपिंडांतून येणारी लघवी मूत्राशयात साठवली जाते.
मूत्रमार्ग : मूत्राशयातून एक नळी पूरस्थ ग्रंथीतून लिंगात जाते. या नळीतून लघवी मूत्राशयातून लिंगावाटे बाहेर सोडली जाते. वीर्यपतनाच्या वेळी वीर्य याच नळीतून लिंगावाटे बाहेर सोडलं जातं.
पूरस्थ ग्रंथी (प्रोस्टेट ग्लँड) : पूरस्थ ग्रंथी हा एक सुपारीच्या आकाराचा अवयव आहे. या ग्रंथीत एक स्राव तयार होतो.

कोपर ग्रंथी : लिंगाच्या मुळाजवळ दोन कौपर ग्रंथी असतात. यांच्यात एक पारदर्शक स्राव तयार होतो.

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख १५