पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२. जननेंद्रियांची ओळख


 इंटरसेक्स व त्याचे विविध प्रकार समजून घेण्याआधी सर्वसामान्य पुरुषांची व स्त्रियांची जननेंद्रिय कशी असतात, त्यांचं कार्य काय असतं हे समजून घेणं आवश्यक आहे. हे समजून घेतल्यावर आपल्याला गर्भाची जननेंद्रिय घडताना, जननेंद्रियांची वाढ होताना त्यात कोणते बदल झालेतर जननेंद्रियांत वेगळेपण येतं हे कळेल.

पुरुषाचे जननेंद्रिय

वृषण : पुरुषांना दोन वृषण असतात. हे वृषण एका त्वचेच्या पिशवीत (वृषणकोशात) असतात. वृषणात टेस्टोस्टेरॉन हे संप्रेरक तयार होतं. वयात आल्यावर वृषणात पुरुषबीजं तयार होऊ लागतात. बोली भाषेत वृषणांना 'गोट्या' म्हणतात.
 बहुतेक मुलांच्यात दोन्ही वृषण एकाच आकाराचे नसतात. एक दुसऱ्यापेक्षा थोडं मोठं असतं. तसंच एक वृषण दुसऱ्यापेक्षा थोडं खाली लोंबतं.
पुरुषबीजवाहिनी : प्रत्येक वृषणातून पूरस्थ ग्रंथीकडे जाणारी एक पुरुषबीजवाहिनी असते. वीर्यपतनाच्या वेळी वृषणांतील पुरुषबीजं या नळ्यातून पूरस्थ ग्रंथीकडे जातात.
वीर्यकोश : पूरस्थ ग्रंथीच्या बाजूला दोन वीर्यकोश असतात. मुलगा वयात आला, की त्याच्या वीर्यकोशात वीर्य तयार व्हायला लागतं.
लिंग/शिस्न : लिंग हा तीन मांसल नळ्यांनी बनलेला अवयव आहे. नैसर्गिकरीत्या लिंगाला थोडासा बाक असतो. लिंगाच्या टोकाला एक फुगीर भाग असतो ज्याला शिस्नमुंड म्हणतात. लिंगातून लघवी बाहेर सोडली जाते.

वयात आल्यावर लिंग संभोगाचा एक अवयव बनतं. वीर्यपतनाच्यावेळी

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख १४