पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 इंटरसेक्स संकल्पनेचं प्रतीक आपण अर्धनारीनटेश्वरात बघतो. शिवपार्वतीचं एकत्र रूप म्हणजे अर्धनारीनटेश्वर. या देवाची निर्मिती कशी झाली याच्या अनेक पौराणिक कथा आहेत. या देवाचे देऊळ महाराष्ट्रात वेळापूरला अकलूज-सांगोला रस्त्यावर आहे.



वेळापूर येथील
अर्धनारीनटेश्वराचं मंदिर
© Bindumadhav Khire
 प्राचीन आयुर्वेदाच्या ग्रंथात इंटरसेक्स व्यक्तींची लक्षणं आढळतात. अर्थात त्या काळात इंटरसेक्स शब्द नव्हता, पण काही शब्दांवरून अंदाज लावता येतो. अशी काही उदाहरणं पुढे दिली आहेत. [1]

| ग्रंथ | लेखक शब्द अंदाजे अर्थ चरक संहिता | चरक द्विरेतस तृणपुत्रिक इंटरसेक्स मुलांमधील लैंगिक वेगळेपण/इंटरसेक्स वार्ता मुलींमधील लैंगिक वेगळेपण/इंटरसेक्स नपुंसक | इंटरसेक्स/ तृतीयपंथी/समलिंगी/ स्त्रीबीजं नसलेली स्त्री/

पुरुषबीजं नसलेला पुरुष/

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख ११