पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाग १- माहिती


१. प्राचीन काळ


 जन्माला आलेल्या बाळाच्या जननेंद्रियांकडे बघून ते बाळ मुलगा आहे का मुलगी आहे हे आपण ठरवतो. जर बाळाला वृषण असतील, लिंग असेल तर ते बाळ मुलगा आहे व मोठे व छोटे भगोष्ट, शिस्निका, योनी असेल तर ते बाळ मुलगी आहे असं आपण म्हणतो.
 काही वेळा अशी बाळं जन्माला येतात, जिथं बाळ मुलगा आहे का मुलगी आहे हे समजणं अवघड होतं (उदा., जर जन्माला आलेल्या बाळाला वृषण असतील, शिस्निका असेल व योनी असेल तर त्या बाळाला मुलगा म्हणायचं का मुलगी?) कारण अशा बाळांची बाह्य/आंतरिक जननेंद्रियं स्पष्टपणे मुलाची किंवा मुलीची म्हणून विकसित झालेली नसतात.
इंटरसेक्सची व्याख्या
 ज्या व्यक्तींमध्ये गुणसूत्र, गोनाड्स किंवा स्राव/संप्रेरकांच्या वेगळेपणामुळे काही अंशी पुरुषाची बाय/आंतरिक जननेंद्रिय असतात व काही अंशी स्त्रीची बाय/आंतरिक जननेंद्रिय असतात अशा व्यक्तींना इंटरसेक्स म्हणतात.





 मुंबईजवळील
 एलिफंटा केव्हजमधील
 अर्धनारीनटेश्वराच्या
 शिल्पाची चित्रकृती.

© Chandrashekhar Begampure

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख १०