पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे. कोलकाता हायकोर्टात सरकारी वकिलाने युक्तिवाद केला, की पिंकीची लिंग गुणसूत्र XY आहेत व तिला एक छोटे लिंग आहे म्हणून तिला बलात्काराची कलमं लागू होतात.
 पिंकीच्या बाजूने 'लॉयर्स कलेक्टिव्ह' संस्था उभी राहिली. अॅडव्होकेट आनंद ग्रोवर यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्यांनी वैद्यकीय अहवालाचा दाखला दिला, की पिंकी ही इंटरसेक्स व्यक्ती आहे व तिचं लिंग खूप छोटं/अविकसित असल्यामुळे ती इतर पुरुषांप्रमाणे संभोग करू शकत नाही.- “.... showed features suggestive of disorder of sexual development, Male Pseudohermaphroditism... (Pinki) was incapable of performing sexual ntercourse like that of an adult male in ordinary course of nature because of rudimentary phallus with very small corpora - cavernosa and corpora spongiosm and presence of perineal hypospadias."
 पिंकीने आपण पुरुष आहोत असं कधीच सांगितलं नव्हतं (म्हणजे तिने तक्रारदाराची फसवणूक केली नव्हती); केवळ फिर्यादीची मुलगी पिंकीला 'पापा' म्हणत होती याचा अर्थ पिंकी पुरुष ठरत नाही; पिंकी पुरुष नसल्यामुळे ती दुसऱ्या स्त्रीला लग्नाचं आमिष दाखवू शकत नाही; फिर्यादी विवाहित असल्यामुळे पिंकी (जरी तात्पुरतं मानलं की ती पुरुष आहे) फिर्यादीशी कायद्याने दुसरं लग्न करू शकत नाही, इत्यादी बाबी मांडल्या गेल्या.

 हा युक्तिवाद कोर्टाने स्वीकारला व १२ सप्टेंबर २०१४ला कोलकाता हायकोर्टाचे न्यायाधीश सुब्रता तालुकदार यांनी पिंकीला निर्दोष घोषित केलं. पिंकीला परत नोकरीवर रुजू करण्यात आलं.

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख १००