पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
परिशिष्ट (अ) संदर्भ


भाग १ माहिती
(१) प्राचीन काळ


[१] आयुर्वेद संदर्भ
 काही प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये काही असे शब्द व लक्षणं दिली आहेत, ज्यावरून ते शब्द/लक्षणं इंटरसेक्ससाठी वापरलेले आहेत असा अंदाज लावता येतो.
 उदा. १- ज्या स्त्रीला स्तन नाहीत, ज्या स्त्रीला पाळी येत नाही व मैथुनाच्या वेळी जिची योनी खरखरीत लागते तिला 'पंढी' म्हणतात. (माधव निदान)
 उदा. २- जर पुरुषबीजाचं वर्चस्व स्त्रीबीजापेक्षा जास्ती असेल तर मुलगा होतो, स्त्रीबीजाचं वर्चस्व जर पुरुषबीजापेक्षा जास्त असेल तर मुलगी होते व दोघे तुल्यबळ असतील तर 'द्विरेतस' होतं. (स्त्री वा पुरुष या दोघांचे गुण असलेली व्यक्ती) (अष्टांग हृदय). (आताचं शास्त्र खूप विकसित आहे. प्राचीन आयुर्वेद ग्रंथांमधील या माहितीची जर आताच्या शास्त्राशी तुलना केली तर दिसून येतं, की ही उदा.२मधील माहिती चुकीची आहे.)
- चरक संहिता- लेखक : चरक. भाग : शरीरस्थान.
 इंग्रजी भाषांतर डॉ. रामकरण शर्मा, विद्या भवन दास, प्रकाशक : संस्कृत सिरीज, वाराणसी.
- सुश्रुत संहिता- लेखक : सुश्रुत. भाग : शरीरस्थान, उत्तरस्थान
मराठी भाषांतर : वैद्यराज दत्ता बल्लाळ बोरकर, मुक्काम- इस्लामपूर, यज्ञेश्वर गोपाळ दीक्षित, बुधवार पेठ, प्रथम आवृत्ती-१९४३.

इंग्रजी भाषांतर : कवीराज कुंज लाल भिषाग्रथ, प्रकाशक : एस. एल. भादुरी, कोलकाता, सन १९१६.

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख १०१