पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

झालें होतें तोच. या राजपुत्रास इंग्लिश लोकांनी मोठ्या सन्मानानें बोलावून आणिलें होतें खरें, परंतु काही दिवस- पर्यंत त्याजवळ लोक बहुत येईनात; ह्मणून तो उदातीन झाला. तो प्रथम एक्सीटर शहरास गेला, तेथचे लो- कांनी नुकतेच मान्मौथ याचे बंडाकरितां शिरच्छेद झाले होते, ह्मणून त्याचा पक्ष धरिला नाही. या रीतीनें दहा दिवस पर्यंत राजविरुद्ध लोक येऊन आपणास मिळतील, अशी आशा करून तो तेथें होता; आणि उदास होऊन आपले सैन्य परत न्यावयाचा विचार करूं लागला. इल- क्यांत कित्येक थोर लोक येऊन त्याच्या पक्षास अनुसरले, तेव्हां देशचे सर्व लोक येऊन त्यास मिळाले, धर्मपक्षी, कामगार, आणि राजाचे चाकर या सर्वांनी जेम्स राजास सोडावयास आरंभ केला. लार्ड चर्चाहल ह्मणून होता, त्यास राजानें मोठ्या पदवीस चढवून फौजेचा सरदार केला होता, आणि त्यास सर्व संपत्ति राजापासून मिळाली होती; असें असतांही तो, पूर्वील राजाच्या राखेच्या पोट- चा मुलगा डयूक ग्राफतन, कर्नल बॉक आणि दुसरे कि त्येक ग्रांस घेऊन गेला. सरदार, राजाचे परम प्रीतींतली मुलगी आन, आणि तिचा नवरा डेन्मार्क देशचा राजपुत्र या दोघांनी तो दुर्बल झा- ला पाहून, निश्चय केला की, त्यास सोडून शत्रूंचा पक्ष धरावा. आपले इतर मित्रांनी जें केलें त्याच रीतीनें तो राजपुत्र आणि राजकन्या यांनी वागावयाचा आरंभ केला, असे त्यास समजले तेव्हां तो अतिशय दुःखी होऊन बो- लिला; " ईश्वर मला सहाय होवो, माझे प्रत्यक्ष मुलांनी मला सोडिलें.” शेवटीं सर्व मिळून आपला नाश करि-