पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९५ १६८८ त्याजवर जुलूम राजाचा लोभीपणा आणि हालंड देशांतील सरकारचा मत्सर ही दोन पाहून त्याची बुद्धि सूक्ष्म झाली होती, आणि त्यास कपट युक्ति समजली होती. इ०स० या समयीं त्याचे लक्ष्यांत आले कीं, जेम्स रा- जाचा लोक अतिशयच द्वेष करितात. चालिले होते, त्यांची बारीक बातमी त्यास लागली; आणि पुढे राज्य आपणास मिळावे अशी तो आशा करूं लागला. धर्माध्यक्षांचा अपमान झाल्यामुळे लोक परम संतप्त झाले आहेत, अशा समयीं विलियम यानें उद्योग आरं- भिला. पूर्वीच त्यानें डच अरमारांत नवीं गलव ठेवून बंदरांत सर्व तयारी करून ठेविली होती. कांहीं अधिक शिपाईही ठेविले, आणि दुसरे कामाकरितां उत्पन्न केलेला पैका, त्या लढाईकडे लावावयाचा आरंभ केला. तो सर्व मसलती अशे चातुर्यानें करी कीं, तीन दिवसांत त्यानें चारशांवर जाहाजें भाड्याने केली. निमेग्युएन शहरां- तून निघून फौज व सामान नदी आणि ओढे यांतून जा- ऊन जाहाजांवर चढले; नंतर तो पांचशें गलबतें व चव- दा हजार फौज घेऊन हेल्वेट् स्लुइस शहरांतून निघून गेला. ती फौज व गलबतें फ्रान्स देशांत जाऊन उतरणार, अशी सर्वत्र बातमी उठविली; याकरितां तें आरमार जेव्हां इंग्लिश यांचे दृष्टीस पडले तेव्हां ती आपले कांठावर उतरेल अशी त्यांचे मनांत किमपि शंकाही आली नाहीं, या रीतीनें दोन दिवसपर्यंत चालून नवेंचर महिन्याचे पां- चवे तारखेस तोर्बे प्रांतांत ब्राक्सहोम खेड्यांत सैन्य उत- रलें. तो दिवस पूर्वी सांगितलेले दारूचें बंड ज्या दिवशीं