पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तील असे प्रतिदिवशीं विशेष स्पष्ट दिसूं लागले, त्यामुळे तो जेम्स भयभीत होऊन मित्रांनी सांगितलेली बाहेर नि घून जावयाची मसलत ऐकण्याचा निश्चय करिता झाला. प्रथम त्यानें राणीस बाहेर घालविली, ती क्यालेस शहरास सुखरूप पोचल्यावर कांहीं दिवशीं एके रात्रीस आपण नुकताच धर्मांत आलेला असा एक सर एड्वर्ड हेल्स ह्मणून गृहस्थ होता, त्यास बरोबर घेऊन नाहींसा झाला, परंतु पुढे त्याला धरून लोकांनी परत आणिलें. पुढे त्यास राचेस्तर शहरामध्ये कैदेत ठेविलें. तेथें आपले लोकांनी आपला केवळ त्याग केला पाहून फ्रान्स देशचा राजा आपला स्नेही आहे, त्यास तरी शरण जावें, असा त्यानें बेत केला. त्याप्रमागें तो आपले राखेचा मुल गा ड्युक बार्विक यास बरोबर घेऊन निघून गेला. तो पिकर्डी प्रांतांत आंब्ल्ल्यूस गांवांत सुखरूप पोंचला, आ- णि तेथून फ्रान्स देशचे दरबारांत जाऊन राहिला; तेथे राजा आणि महंत हे किताब त्याचे चालत असत, त्यांत शेवटचा किताब त्यास फार प्रिय असे. या रीतीनें जेम्स राजानें राज्य सोडून दिल्यानंतर पुढे कोणांस नेमावें हा विचार पडला. कित्येकांचें ह्मणणे पडलें कीं, राजाचा प्रतिनिधि स्थापून काम चालवावें, कित्येक बोलूं लागले कीं, आरेंज याचे राजकन्येस राज्याधिकार द्यावा, आणि राजाचा मुलगा त्या च्या पोटचा नव्हे असें जाणावें. मग दोनही पार्लमेंट सभांत याविषयीं बहुत विवाद होऊन एक पक्षापेक्षा दुसऱ्या पक्षांत दोघांची संमति अधिक पडल्यामुळे ठरलें कीं, प्रतिनिधि स्थापावा यापेक्षां राजाच नेमावा हे चांगले. त्याप्रमाणें इ०स० १६८९