पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९४ ठेवून चौकशी करावयाकरितां सरकारी वकिलांस राजानें आज्ञा केली. जून महिन्याचे २९ तारिखेस त्यांची चौकशी व्हाव- याचा बेत झाला होता. ते बंदिशाळेत गेले, त्यापेक्षा आले तेव्हां लोक फार जमले. तो विचार ठरला, ह्मणजे राजाचें बरें, वाईट, स्वतंत्रता, किंवा सेवकभाव में स्थिर व्हावें असें होतें. त्या प्रकरणी उभयपक्षांच्या वकिलांत चांगला युक्तीनें वाद झाला. हालोवे आणि पवेल या दोघे न्यायाधीशांनी कळविलें कीं, आह्मास धर्माध्यक्षांचा पक्ष खरा वाटतो. मग जुरीने एके कोठडींत सारे रात्र- भर विचार करून सकाळी येऊन कोर्ट यांत स्वमत सां- गितलें कीं, धर्माध्यक्ष आमास निरपराधी वाटतात, ते ऐ- कून वेस्तमिन्स्तर सभेत मोठा जयजयकार झाला, तो सर्व शहरांत विदित होऊन लोकांत गडबड झाली. त्या वेळेस हन्स्लो ह्मणून ठिकाण आहे, तेथें लार्ड फीवर्शम याचे तंबूत राजा जेवीत होता, त्यानें ती गडबड ऐकून विचा- रिलें कीं, हें काय? तेव्हां त्यास कोणी सांगितले की, तें कांहीं नाहीं, धर्माध्यक्षांची मुक्तता झाली ह्मणून शिपाई लोक आनंद करीत आहेत. हे ऐकून तो बोलिला, “तुह्मी तें कांहीं नाहीं असें ह्मणतां ?" 66 राज्यांतील वर्तमान असें असतां, जेम्स् राजाची मेरी ह्मणून मुलगी होती, तिचा नवरा प्रिन्स आरंज, विलि- याकडे सर्व लोकांचें लक्ष्य लागले. त्यानें काम कारभारांत पडल्यापासून बहुत संकटे आणि विपत्ति भो- गून, अनेक राजमसलती केल्या होत्या. यम, फ्रान्स देशचे