पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९३ स्या कामगारांनी फ्रान्सिस यास मान्य केलें नाहीं. मा- ग्डेलन ह्मणून आक्सफर्ड शहरांत विद्यालय फार मातबर होतें, तेथील मुख्याची जागा रिकामी झाली. त्या स्थ ळावर फार्मर ह्मणून एक फार हलके आवरूचा पुरुष नुकताच पोप याचे मतांत आला होता, त्याची नेमणूक व्हावी ह्मणून राजानें हुकूम केला. तेव्हां तेथील फेलो यांनी मोठ्या नम्रतेनें आज्ञा फिरवावयाविषयों राजास विनं- तीपत्र लिहिलें. असा त्यांचा आपले कायदे रक्षण कर ण्याविषयों दृढ निश्चय पाहून जेम्स् राजानें दोन सोडून बाकीच्या सर्वांस काढून टाकिलें. , पुढें धर्माचे स्वतंत्रतेविषयीं दुसरी एक पूर्वीसारखीच जाहिरात लाविली, आणि हुकूम झाला कीं, इ०स० सर्व धर्मपक्ष्यांनी देवळांत ती वाचावी, परंतु १६८८ हा हुकूम मानूं नये, असा निश्चय त्या सर्वांनी मिळून केला. सान्कोफ्ट, लोय्ड, व आसाफ एथील धर्माध्यक्ष; केन, बाथ आणि वेल्स या दोहोंचा; टर्नर, एलीचा, लेक, चिचेस्तरचा; वेट, पीटर्बरोचा आणि त्रिलानी ब्रिस्तलचा; इतक्यांनी मिळून राजास अर्जी केली कीं, ही आज्ञा वाचणें हें आमच्या धर्मास योग्य नव्हे. यावरून राजास कोप येऊन त्यानें धर्माध्यक्षांस आपले अमात्य सभेस बोलावून आणिलें; आणि विचारिलें कीं, ही अर्जी तुह्मी केली कीं नाहीं ? कांहीं वेळपर्यंत उत्तर न देतांते उगीच राहिले; परंतु मुख्य मंत्र्यानें त्यांस फार आग्रह केला, ते- अर्जी कबूल केली. ते जामीन द्यावयास राजी नव्हते; ह्मणून त्यांस लागलेच किल्यावर टाकावें असा हुकूम झाला; आणि त्यांवर अपमान पत्राचा आरोप व्हां त्यांनी