पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९२ शप यांस बोलावून आणून तो आणि शार्प या दोघांचा उद्योग बंद केला. नंतर जेम्स राजानें सर्व मताचे लोकांस इच्छस येईल त्याप्रमाणें धर्मांविषयीं विचार करावयाची मोकळीक दिली; कारण त्याचा समज असा होता कीं, अशानें रोमनक्या- थोलिक मताचा श्रेष्ठपणा प्रसिद्ध होईल; आणि इतर मतें मोडून सर्वत्र त्याची प्रवृत्ति होईल. मग पोप यास आपली आधीनता कळविण्याकरितां, आणि त्याचे मतावर आपले राज्यांतील लोकांचा विश्वास बसावयाकरितां, अर्ल क्या- स्तिल्मेन यास आपला वकील करून रूम शहरास पाठ- विलें. असा अविचारी उद्योग पाहून रूम शहरचे सर- कारानें वकिलाचा फार मान केला नाहीं. राज्यांत जागोजागी विद्यालयें वांधावयास जेम्स राजाने जेसविट लोकांस परवानगी दिली, मग ते उघड रोमन- क्याथोलिक रीतीनें देवभजन करूं लागले; आणि त्या मताचे चार धर्माध्यक्षांस राजाचे देवळांत नेमून मुलुखांत पाठविले. फ्रान्सिस ह्मणून एक बेनिदिक्त मंडळींतील महंत होता, त्यास राजानें मास्तर आफ आर्टस पद घ्यावयास केंब्रिज शहरांतील सर्व विद्यालयांत पाठविले, परंतु त्याचे मतामुळे तेथील लोकांनी राजास विनंतीपत्र पाठविलें कीं, आपला हुकूम कृपाकरून फिरवावा. ती विनंती राजानें मनास आणिली नाही, आणि त्यांचेकडचें बोलावयाक- रितां वकील आले होते, त्यांची भेटही घेतली नाहीं. वैस- चान्सेलर ह्मणजे शाळेतील मुख्याचा प्रतिनिधि यास हैकमिशन कोर्ट यांत आणून पदावरून काढिले; तथापि