पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९१ कल्याण होते, परंतु ते तसे झाले नाहीं, आणि युद्धांत जे धरिले गेले होते, त्यांस त्या विजयो सैन्यानें बहुतच पीडा केली. फिवर्शम यानें जय पावल्यानंतर लागलेंच सुमारें वीस बंदिवानांस फांशीं दिलें. अपराधी लोकांची चौकशी करायाकरितां जेफरीस ह्मणून न्यायाधीश नेमिला होता, तो लश्करी सरदारांपेक्षां फार क्रूर होता. तो पुरुष मुळ- चाच क्रूर होता, तशात नित्य मद्यपानानें विशेष उन्मत्त होत असे. त्याने बंदिवानांस सांगितलें कीं, तुझी कबूल होऊन मला चौकशीचें श्रमांत न पाडाल, तर तुझास कांहीं क्षमा होईल, नाहीं तर कायद्याप्रमाणे मला निष्ठुर- तेनें वर्तावें लागेल. हें ऐकून बहुत हतभाग्य लोक कबूल झाले, तेणेंकरून त्वरीत मुत्यू पावले. वस्तर शहरांत सुमारें ऐशीं मेले; तसेच एक्सांतर, तांतन आणि वेल्स या सर्व ठिकांणी मिळून त्यापासून दोनशे एकावन्न मेले गेले. धर्मप्रकरणी जेम्स राजा यापेक्षां अधिक जुलूम करीत असे. त्या वेळेस पोप याचे मताशीं विरुद्ध जे लोक होते, त्यांत लंडन शहरांतला डाक्तर शार्प या नांवाचा एक धर्मपक्षी होता. पोप याचे मिशनारी लोकांचे सां- गण्यावरून ज्यांनीं धर्म बदलला होता, त्यांची तो फार निंदा करी. त्यावरून राजास फार राग आला. मग लंडन शहरांतील बिशप यास खचित आज्ञा केली कीं, राजा हुकूम करी तंवपर्यंत त्यास कामावरून दूर करावें. धर्माध्य क्षानें ही आज्ञा मानिली नाहीं; ह्मणून राजाने त्याचेंच प्रथम शासन करावयाचा निश्चय केला. त्याविषयीं धर्म- पक्ष्यांची एक मंडळी नेमिली, तीतले साहा मनुष्यांस धर्म- प्रकरणी संपूर्ण अधिकार दिला. नंतर या मंडळीपुढे बि ९