पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९० पत्रे पाठविली; आणि त्या राजानेंही पराजित शत्रूच्या दुःखानें आपले नेत्र तृप्त करण्याकरितां त्याची भेट घेतली. त्या वेळेस तो ड्युक आपल्या गुडघ्यांवर उभा राहून मोठ्या दीनतेनें जीवदान मागूं लागला. पुढे राजानें तो पूर्व रा जाचा असल पुत्र नव्हे असा कागद करून दिला त्यावर त्यानें सही केली. ती सही झाल्यावर राजाने त्यास सां- गितले की तुझा अपराध फार मोठा, याकरितां तुला क्षमा होणार नाहीं. आपले चुलत्याची दया होण्यास कांहीं कारण राहिले नाहीं असें पाहून, तो आपलें चित्त आवरून तिरस्कारानें तेथून निघून गेला. दया येऊन ते त्याचे मागून गेले. बहुत लोकांचे मनांत त्यानें शिरच्छेद कर अशी त्यानें णारास सांगितले की, रसल याचे वेळेस तुला दुसऱ्यानें शस्त्र मारावें लागले तसे आतां करूं नको. सावधगिरी केली ती फुकट गेली; कारण त्यास कंप झा ल्यामुळे त्याचें शस्त्र जोरानें लागले नाहीं. ड्युक यानें त्यास सूचना करावयास डोके वर करून पुनः तें खालों ठेविलें, आणि त्या माणसाने पुनः शस्त्रप्रहार केला, परंतु मग त्यानें कुन्हाड हातांतली खाली ठेविली, परंतु शेरीफ यानें ताकीद केल्यामुळे त्यानें आणखी दोन वेळ प्रहार करून डोकें तोडिलें. इंग्लिश यांस परम प्रिय जो जेम्स, ड्युक मान्मौथ त्याचा या रीतीनें अंत- काळ झाला. तो शूर, निष्कत्रिमी, आणि भला होता; परंतु त्यास आत्मस्तुति फार आवडत असे, ह्मणूनच त्यानें आपले सामर्थ्याबाहेर उद्योग केला. व्यर्थ गेला. हा रक्तपात झाला, इतक्यानेंच जर पूर्वीचे अपराधाचें शासन झाले असतें, तर बंडवाल्यांचे आणि राजाचेंही