पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८९ राज्य घ्यावे. फीवर्शम पूर्वी राजाचा सरदार सांगितला, त्याची गफलत पाहून मान्मौथ यानें त्यावर हल्ला केला. प्रथम ते राजाचे पायदळास जाग्यावरून हालवून पराजय करण्याचे युक्तींत होते. इतक्यांत मान्मौथ यानें कांहीं वेडेपणा केला, आणि घोडेस्वारांचा सरदार लार्ड ग्रे होता, तो प्रथम पळाला, ह्मणून राजपक्षी सैन्याने पुढून हला करून सुमारे एके प्रहरांत त्याचा केवळ पराभव केला. लढाईंत सुमारे तीनशे पडले, आणि पळते वेळेस एक हजार मेले गेले. ज्या युद्धाचा आरंभ शुद्ध अविचारपूर्वक झाला, आणि ज्याचा उद्योगही आळसेकरून झाला, तें युद्ध तें? या रीतीनें समाप्तीस गेलें. . नंतर मान्मौथ घोड्यावर बसून रणभूमीपासून सुमारें वीस मैल पळाला, तेथे त्याचा घोडा बसला. तेव्हां तो वरून उतरला, आणि आपली वस्त्रे एके गुराख्यास देऊन त्याची कापडें आपण नेसला. त्याचे बरोबर हालंड देशां- तून आलेला एक जर्मनी देशचा कौंट होता, आणि हे दोघे क्षुधा आणि श्रम फार सोसून एके शेतांत निजले, आणि त्यांनी आपले अंगावर गवत घेतलें इतक्यांत डयुक याचे शोधार्य मागून येत होते, त्यांनी त्यांची वस्त्रे अंगावर धारण केली आहेत असा एक गुराख्या पाहिला; ह्मणून ते फार जपून शोधूं लागले. शेवटीं त्याचे बरोबर कुत्रीं होती त्यांनी त्याचा शोध लाविला. त्याने प्राणरक्षणार्थ

ओला वाटाणा शेतांतून जमा केला होता, तो त्या वेळेस त्याचे खिशांत होता. जेव्हां तो शत्रूंचे हाती सांपडला तेव्हां त्यास रडें आलें, आणि त्याने प्राण वांचवावयाकरितां बहुत प्रार्थना केली. नंतर राजास त्यानें बहुत नम्रतेने