पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८८ पुष्कळ फौज त्यावर आल्यामुळे त्याचें सैन्य नाश पावलें, आणि तो पळून जावयाच्या उद्योगांत होता, अशांत घाय लागून धरिला गेला. तो गळाभर पाण्यांत उभा असतां यास एके शेतकऱ्यानें धरिलें. तेथून त्यास एडिन्वरो शह- रास नेलें, तेथें तो धैर्ययुक्त मनाने अनेक प्रकारचे अप मान सोतून शेवटीं शिरच्छेद पावला. त्या वेळेस मान्मौथही डार्सेत प्रांतांत आला, त्याचे बरोवर सरासरीस शंभर लोक होते, परंतु इंग्लंड देशांतले लोकांची त्यावर अतिशय प्रीति, आणि जेम्स राजाचे शरीर, व धर्म यांचा सर्वांस परम द्वेष होता, ह्मणून चार दिवस झाले नाहीत इतक्यांत त्याजवळ दोन हजारांवर लोक जमले. तितके घेऊन तो टांटन शहरास गेला, तो साहा हजार झाले, आणि दुसरे बहुत त्याचे जरीपटक्या जवळ येत असत, त्यांस आयुधें नाहींत ह्मणून प्रतिदिवशीं निरोप द्यावा लागे, तो ब्रिज्वाटर, वेल्स आणि कोम या ठिका णांस गेला होता, तेथील लोकांनी त्यास मान्य केला, परंतु ही निरर्थक प्रतिष्ठा मिळवावयास लागून यानें युद्धाचा समय घालविला. त्याचा चढाव पाहून राजास फार भय वाटलें. पुढे त्या सैन्याचें निवारण करण्याकरितां हालंड देशांतून इंग्लिश लोकांच्या साहा पलटणी बोलाविल्या; आणि दुसरे तीन हजार लोक जमवून त्यांचा सरदारपणा फीवर्शम आणि चर्चहल या दोघांस दिला. मग त्यांनी इतक्या फौजेनिशीं जाऊन ब्रिजवाटर याजवळ जज्मोर या नांवाचें गांव आहे तेथे तळ दिला. तेथें त्यांस प्रांतां- तील मिलिशिया याचे लोक येऊन मिळाले. त्या ठिकाणीं मान्यौथ यानें निश्चय केला कीं, आतां प्राण द्यावा किंवा