पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८७ मनक्याथोलिक देवळांत ईश्वर भजनास जाई. त्याने क्यारील ह्मणून कोणी होता, त्यास वकील करून रूम शहरास पोप याजवळ पाठवून दिले; आणि इंग्लिश यांस पुनः त्या रोमनक्याथोलिक धर्मांत आणावें, ह्मणून त्याने यत्न आरंभिला. पुढे ड्युक मान्मथ यानें वंड उत्पन्न केलें, त्यापासून राज्यांत अनर्थ व्हावयाचा आरंभ झाला. त्यानें पूर्वी बंड केलें तेव्हां त्यास क्षमा मिळाली, परंतु रा- ज्यांतून बाहेर निघून हालंड देशांत जावे, अशी आज्ञा केली होती;ह्मणून कांहीं दिवस प्रथम तेथें होता; पुढे जेम्स राज्य करूं लागला, त्या वेळेस प्रिन्स आरेंज यानें त्यास बाहेर घालविलें. मग तो ब्रसल्स शहरांत गेला, परंतु तेथेही शत्रु पाठ सोडीत नाहीं, असे पाहून, त्यानेही त्याजविषयीं तसाच निश्चय करून पुनः एक वेळ राज्यावर प्रयत्न आ- रंभिला. पूर्वीपासून लोकांची त्यावर बहुत प्रीति असे; ह्मणून त्यांनीं बातमी उठविली कीं, मान्मौथ याचे आई- शीं चार्लस राजानें लम्र केलें; ह्मणून तो चार्लस राजाचा औरस पुत्र ड्युक आर्गेल यानें त्याचा बेत स्काट्लंड देशांत सिद्धीस नेण्याचा उद्योग आरंभून दुहेरी बंडाचा बेत केला; तो असा कीं, मान्मौथ यानें पश्चिमेकडील लोकांस उठ- वावयाविषयीं यत्न करावा, आणि आर्गेल यानें उत्तरेकडेस उद्योग करावा. आर्गेल यानें प्रथम स्काट्लंड देशांत येऊन जाहिराती प्रसिद्ध करायाचा प्रारंभ केला, आणि दोन हजार पांचशे लोक जमवून आपण सरदारपणा १६४५ पतकारिला. त्यानें लोकांस आपले पक्षाविषयीं इ० स ' अभिमान पडावयाकरितां यत्न बहुत केला; परंतु राजाची