पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शी करायास बसले होते त्यांस बोलिला कीं, जर तुह्मां स वींस जाळून मीही जळालों असतो तर मला सुख झाले अ सतें. अमात्यांपुढेही तो असेंच स्वस्थपणीं बोलिला; त्यानें आपले साथी कोण हें सांगितले नाहीं; त्यास इतके मात्र वाईट वाटले कीं, आपला वेत सिद्धीस गेला नाहीं. शेवटीं त्यास दोन तीन दिवस बंदींत ठेविलें, आणि शस्त्रे दाख- "विली, तेव्हां त्यानें घावरून सर्व वृत्तांत सांगितला. फाक्स धरिला गेला असे समजतांच, क्येटस्वी, पर्सी · आणि दुसरे वंडवाले लागलेच त्वरेनें वार्षिक प्रांतांत नि- घून गेले. तेथें सर एड्वर्ड डिग्बी होता, त्याने आपला बेत सिद्धीस जाईल अशा भरंवशावर युद्धाची सर्व सिद्धता करून ठेविली होती. परंतु तें वर्तमान समजतांच जिकडे तिकडे लोक सावध झाले होते, ह्मणून ते बंडवाले जेथें जेथें जात, तेथें तेथें त्यांपेक्षा अधिक फौज लढायास तयार असे. असें चोहोंकडून निरुपाय झाल्यावर ते सुमारें ऐशी लोक होते, त्या सर्वांनी निश्चय केला की, आतां पुढे जाऊं नये, आणि वार्षिक प्रांतांत एके घराचा आश्रय करून राहून जितका हातानें नाश होईल तितंका करून मग मरावे. तसे त्यांनी केले. पुढे त्यांचे घराभोवता वेढा पड- ला, तितक्यांत दुसरा एक अनर्थ झाला. तो असा की, बंदुकीची दारू एके ठिकाणी वाळत ठेविली होती, तीवर कोठून एक विस्तवाची ठिणगी पडली, तेणेंकरून ती दारू अकस्मात पेटून त्या वंडवाल्यांतून बहुतांची अंगे भाजली. तें पाहून बाकीचे होते ते निराश झाले, आणि दारें उघ- डून अकस्मात जाऊन शत्रूंवर पडले. त्यांतून बहुतांचे तत्क्षणींच तुकडे तुकडे झाले, क्येटस्बी, पर्सी, आणि ,