पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७ विटर, हे तिघे एकापाठीमागे एक राहून बहुत वेळ लढाई करीत होते; शेवटीं पहिले दोघे बहुत जखमी होऊन पडले, आणि विंटर जिवंत सांपडला. त्या लढाईंतून जे बाकी राहिले होते त्यांची चौकशी होऊन यथायुक्त शासनेनें.. झाली, कितीएकांचा शिरच्छेद झाला, व कितीएकांस राजानें क्षमा केली.. गार्नट आणि ओल्डकार्न त्या मस.. लतीस सहाय होते, त्यांचेंही इतरांबरोबर शासन झाले; असे ते दोघे सरकार गुन्हेगार उघड ठरले असतां, तत्प- क्षी लोकांनी गार्नट यास मार्टिर याची पदवी दिली; आणि त्याचे रक्तापासून अनेक चमत्कार झाले अशा दे- खील गोष्टी ते सांगूं लागले. इ०स०१६१२ राजाने अतिसूक्ष्म दृष्टीनें बंडाचा शोध लाविला, तेणें करून लोकांत त्याचे शहाणपण प्रख्यात झाले. परंतु त्याचे कितीएक स्नेही होते, त्यांच्या इच्छेप्रमाणें तो वर्तत असे, हे मूर्खत्व पाहून लोकांनी त्याचे वास्तविक गुणांची परीक्षा केली. त्याजवळ जे अशा री- तीचे पुरुष होते त्यांत मुख्य राबर्ट कार या नांवाचा स्का ट्लंड देशांतले एके मोठे कुळांतला मुलगा होता. तो कितीएक वर्षेपर्यंत देशाटन करून विसावे वर्षों लंढन यांत आला. त्याचा स्वाभाविक गुण काय तो इतकाच होता कीं, मुख सुंदर; आणि अभ्यासाने साध्य केलेला हा कीं, राजाचे मर्जीप्रमाणे दरबारी डौलाने वागणे. त्या मुलाची दरवारांत बढती होत चालली तो प्रथम नैट झाला, मग वैकोटराचेस्तर; पुढे ग्यार्टर याची पदवी त्यास मिळाली; मग प्रिविकौन्सिलर झाला, आणि शेवटी अल सामर्सेट याचें पदही त्यास प्राप्त झाले. पुढे कि