पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परंतु मग त्याने विचार केला कीं, हे आपण लार्ड साल्स- बरी यास दाखवावें ह्मणजे चांगलें. तो साल्सबरी त्या वेळेस सक्रेतारी याचे कामावर होता. लार्ड साल्सबरी यानेंही प्रथम तिकडे विशेष चित्त दिले नाहीं; परंतु पुढे थोडे दिवसांनी राजा शहरांत आला; तेव्हां त्यानें तो अ माय सर्भेत बसला असतांना, तो कागद त्यास दिला. तो पाहून सर्व अमात्यांची खातरी झाली कीं, कांहीं तरी दगा आहे खरा; परंतु काय आहे हे त्या पत्रावरून कोणास समजेना. अशी सर्व मंडळी संशयांत पडून स्तब्ध बसल्यावर प्रथम राजाने त्या संशयित पत्राचा अर्थ लाविला, आणि सांगितलें कीं, कांहीं तरी बंदुकीचे दारूचा खेळ दिसतो; याकरितां पार्लमेंट याचे दोन्ही सभागृहांचे खा- लचीं विवरें उकरून पाहावी, हे मला चांगले दिसतें. काम सफोक याचा अर्ल, लार्ड चेंबर्लिन याचे कामावर होता, त्यास सांगितले, त्यानें तें मुद्दाम पार्लमेंट यांची सभा व्हावयाचे पूर्व दिवसापर्यंत तकूव ठे- नवंबर ५ हें १६०५ विलें. लार्ड यांचे घराखालीं ज्या लांकडाच्या मोळ्या होत्या त्यांवरून त्याचे मनांत संशय आला, आणि त्यानें एक पुरुष, लांब डगले व बूट घातलेला, आणि हा- तांत फाणस घेऊन त्या भयंकर कर्माची तयारी करितो आहे, असा पाहून लागलाच धरला. त्याचें नांव गैफाक्स त्यानें, दुसरे दिवशीं चांगले पेटावें ह्मणून, सर्व सामान नीट लावून ठेविलें होतें; हे कशावरून समजले की, त्याचे खि- शांत आग घेणारे असे पदार्थ सांपडले; तेव्हां सगळा थांग लागला; परंतु अपराध मोठा, आणि क्षमा होणार नाहीं ही त्या पुरुषाची खातरी होती; ह्मणून बेपर्वा होऊन तो चौक-