पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

"* ८४ त्यानें योजिली. अवरूचा मनुष्य होता; तो पूर्वी बंडांत होता, याकरितां असे दुष्कर्म करून आपला प्राण वांचवावा अशी युक्ति त्या शायदीनें शपथ घेतली की, रसल शहरांत अकस्मात् दंगा करावयाचे मसलतींत होता; परंतु राजदधाचे मसलतींत तो होता, हा आरोप त्यावरचा उड- विला; आणि रम्सी व वेस्त या दोघांनीही तसेंच केलें. जुरीचे सारे लोक राजाचे पक्षाचे होते, ह्मणून त्यावर गुन्हा लागू करावयास त्यांस फार विचार करावा लागला नाहीं. त्याचे शिरच्छेदाकरितां लिंकन्स इनफील्ड्स या नांवाचे ठिकाण आहे, तेथें काष्ठ पुरलें होतें, तेथे जाऊन त्यानें किमपि विकार न पावतां आपले डोकें टेकलें, मग दोन फटक्यांत तें तुटून खाली पडले. अर्ल लेसस्तर याचा मुलगा आल्जर्नन सिड्नी होता, त्याची चौकशी होण्यास पुढे लवकरच प्रारंभ झाला. पूर्वी राजाचा पराजय करावयाकरितां पार्लमेंट सभेनें जें सैन्य ठेविलें होतें, त्यांतील कांहीं अंमल त्याजवळ होता, आणि राजाची चौकशी करावयास जें कोर्ट नेमिलें, त्यां- तही त्याचे नांव होते; परंतु तो न्यायाधीशांत बसत नसे. त्यानें कावेल याचे अपहारास प्रतिबंध केला होता, आणि जेव्हां राजाची पुनःस्थापना झाली, तेव्हां तो स्वेच्छे- नें देशत्याग करून गेला, पुढे त्यास येण्याचें कांहीं काम लागलें, ह्मणून तो राजास अर्जी करून क्षमा पावला. त्या- च्या सर्व आशा आणि कल्पना सर्वसत्ताक राज्यावर होत्या. या सर्वसत्ताक राज्याकरितां त्याने लिहिले, युद्ध केलें, देश त्याग केला, आणि पुनः परतही आला. तसा पुरुष दरवारांत चांगला वाढला नाहीं; आणि त्याकरितां त्यास मारावयास