पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८५ अन्यायानें उद्योग होऊं लागले. त्यावर साक्षी लार्ड हव- र्ड मात्र होता; आणि कायद्याप्रमाणे दोन पाहिजेत, ह्म- णून त्यांनी पुढे विलक्षण युक्ति केली. त्याची खोली शो- घिली तेव्हां त्याचे हातचे कांहीं कागद सांपडले; त्यांत मुख्यत्वें स्वतंत्रपणाचा विषय होता, परंतु राजसत्ताक री- तीस केवळ प्रतिकूळ होते असें नाहीं. तथापि त्यांत कांहीं अधिक करून त्यांतून कितीएक सरकार गुन्हेगारीचे ठर विले. त्यानें त्यावर जाब दिला कीं, कागदांवर कांही ● प्रमाण नाहीं; कारण तें मीच लिहिले असा पुरावा झाला नाहीं; आणि जरी झाला तरी यांत कांहीं गुन्हेगारीचा संबंध नाहीं. हा त्याचा जबाब न ऐकतां जेफ्रीस ह्म- णून त्या वेळेस परम क्रूर मुख्य न्यायाधीश होता, त्यानें पक्षपातानें जुरीकडून त्याला गुन्हेगार ठरविले. पुढे लव- करच त्याचा शिरच्छेद झाला. या राज्यांतील वृत्तांत मनांत आला ह्मणजे भय वाटते. उभयपक्षांकडे अपराध दृष्टीस येतो. तो असा. लोक एकमेकांवर मोठ्या आवेशानें शस्त्र धरायास सिद्ध; दरबा- रांत विषयसुख आणि रक्तपात ही सतत चाललींच आहेत; आणि गडबड व पक्षपात बंद करावयाविषयों उद्योग करावा, अशी कोणामध्यें बुद्धि राहिली नाहीं. पुढे थोडे दिवस हांण्डन याची चौकशी झाली, तेव्हां त्याचा प्राण घ्यावयास कांहींच निमित्त सांपडेना, ह्मणून ४०,००० पौंड दंड मात्र घेतला. हालोवे नामें विस्तल शहरचा एक व्यापारी, तो पळून वेस्टइंडीस देशास गे- ला होता, त्यास परत आणून चौकशी करून शिरच्छेद केला. सर टामस आर्मस्त्रांग ह्मणून दुसरा एक गृहस्थ