पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८३ दिवस तो निघून गेला; ह्मणूनच त्याचें प्राणसंरक्षण झाले. बंडवाल्यांमध्यें कैलिंग या नांवाचे एकानें लंडन शह- रचा मेयर यास पकडलें होतें, ह्मणून आपले शासन हो- ईल, या भयानें त्यानें मसलत केली की, अमात्यांस बंडाचें वर्त्तमान कळवून क्षमा पावावी. कर्नल रम्सी, आणि वेस्त नामें एक वकील होता तो, हे दोघे ती बातमी ऐकून ला गलेच राजाचे पक्षाची शायदी देण्याकरितां त्यांजवळ जाऊन तयार झाले. मान्मौथ लपून राहिला; रसल यास किल्यावर पाउविलें; ये पळाला; हवर्ड धुरांड्यांत लपला होता तो सांपडला. तसेच एसेक्स, सिड्नी व हांण्डन हे पुढे लौकर सांपडले, आणि तेथें लार्ड हवर्ड आपणास प्रतिकूळ साक्षी देतो पाहून फार कष्टी झाले. रम्सी, वेस्त आणि शेपर्ड यांचे शायदी वरून बा- ल्कोट नांवाचे पुरुषाची चौकशी करून, तो बंडास सा- मील असे ठरवून त्याचा शिरच्छेद केला. त्याचे बरो- बर होन आणि राँस, या दोघांसही मारिलें. त्यांनी अ- तिशय खेदयुक्त होऊन आपणांस जें शासन झाले हे योग्य असें कबूल करून, प्राग सोडिला. पुढे लवकरच अल वेड्फर्ड याचा मुलगा लार्ड रसल याचा वध सर्वांपेक्षां अति निंद्य असा उपस्थित झाला. त्या ग्रहस्थांत असंख्य सद्गुण होते; तो ड्युक यार्क याचा बेत पुनः पोप मताप्र- माणे धर्म करावयाचा; असे जाणून त्या खटल्यांत पडला होता. तो उदार, सभ्य, कृपाळू, आणि शूर असे, परंतु त्या दरबारांत हे सर्व गुण केवळ दोषरूप झाले. त्यास विरुद्ध शायदी देणारा मुख्य लार्ड हवर्ड ह्मणून हलके