पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८२ परंतु केवळ मोडले नाहींत. मग त्यांनी त्या कामाचा वि चार करावयाकरितां साहा आसाम्यांची मंडळी नेमिली. त्या ग्रहस्थांची नांवें, मान्मोथ, रसल, एसेक्स, हवर्ड, आल्जर्नन सिड्नी आणि जान हांण्डन, पूर्वी जो या नांवाचा मोठा ग्रहस्थ सांगितला त्याचा नातू, इतके होते. वर सांगितले हे ग्रहस्त आणि आर्गेल याचा ड्युक इतके त्या वंडांत मुख्य होते. या रीतीचेच दुसरेही ल हान बंडवाले नेहमी एके ठिकाणी जमून मसलती करीत, त्या मान्मौथ वगैरे मंडळीस ठाऊकही नव्हत्या. या दु सरे मंडळींत मुख्य ग्रहस्थ होते त्यांची नांवें; कर्नल रम्सी, सर्वसत्ताक राज्याचे वेळचा सरदार, तसाच लफ्टनंट कर्नल वाल्ट, व गुडइनफ, लंडन शहरचा अंडरशेरी फ, मोठा प्रसिद्ध आणि कज्जेबाज, व फगुसन ह्मणून एक धर्मपक्षी, आणि तसेच कितएिक लंडन शहरांतील वकील, व्यापारी, आणि उद्यमी लोक होते. हे लोक एकीकडे जमून मोठमोठे भयंकर असे विचार ठरवीत. एकदां त्यांनी निश्चय केला की, राजा जव्हां न्युमार्किट गावांस जाईल तेव्हां त्यास ठार मारून टाकावें. त्या बंडवाल्यांत एक रंबाल या नांवाचा होता, त्याचें रैहौस नांवाचें घर रस्त्यावर होतें, ह्मणून त्या बंडाचें नांव रैहोस बंड असे पडलें. त्यांनी अशी युक्ति योजिली कीं, राजा त्या वाटेनें जात असतां रस्त्याचे मध्ये एक गार्डे घालून त्याचा रथ थांबवावा, आणि त्या वेळेस कुंपणाचे आंतून दडून गोळी मारावी; परंतु राजा ज्या घरांत राहात होता, त्यास सहज अभि लागल्यामुळे त्यांनी योजिलें होतें, त्याचे पूर्वी आठ