पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८१ आणि चशौर या प्रांतांतले दुसरे कितीएक ग्रहस्थ मिळ- विले. सर विलियम कोर्ली, सर फ्रान्सिस रौल्स, आणि सर फ्रान्सिस ड्रेक यांचीं, आणि लार्ड रसल याची का- गदपत्रे होऊन ठरलें होतें कीं, त्यांनीं अकस्मात् पश्चिम प्रांत फितुर करून उठवावा. शाफत्वरी, व फर्गुसन या नांवांचा धर्मपक्षी, या दोघांनीं शहरचा बंदोबस्त पतकारि- ला. त्यांवर बंडवाल्यांचा मोठा भरंवसा होता. पुढे शाफत्सबरी यास आशा आली की, आपले प्रयत्न आतां सिद्धीस जातील. "शेंकडो बेत याचे फुकट गेले, परंतु हा एक शेवटचा तरी सिद्धीस जाईल अशी त्याची खातर होती. लार्ड र सल यानें मान्मौथ यास सांगून तो उद्योग तहकूब ठे- विला, ह्मणून राज्यांमध्ये आंतले आंत लढाई व्हावयाची राहिली; परंतु शाफ्त्स्बरो याचे मनांत पुढे संकट येईल याचे भय इतके वाढले कीं, तो आपले घरांतून निघून इकडे तिकडे फिरून लंडन शहरचे लोकांकडून उघड बंड करावयाचा उद्योग करूं लागला; पण तो व्यर्थ झा- ला. या रोतीनें त्यानें आपला बेत सिद्धीस जावयास अ- नेक विषे होतात असे पाहून, क्रोधांध होऊन पण केला कीं, माझे स्नेही आहेत तेवढ्यांचेच मदतीनें मी हें काम तडीस पोंचवीन. मग फार दिवस पर्यंत काम सिद्धीस जाईना; ह्मणून क्रोध आणि भय यांहींकरून पीडित होऊन, शेवटीं तो लंडन शहरांतून निघून आमुस्तम शहरास जाऊन, थोडकेच दिवशीं मरण पावला. त्याविषयीं मि- त्रांस दया आली नाही, किंवा कोणी शत्रूही भ्याले नाहींत. शाफत्स्वरी मेला, त्यामुळे बंडवाल्यांचे बेत घसरले खरे,