पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८० इ०स० शहरचे लोकांबरोबर आक्सफर्ड शहरास गेला होता; आणि तो कधीं राजाची निंदा करीत असे. त्या काळी फितुराईचा गुन्हा लंडन शहरांतील ग्रांडजुरीनें त्यावर ठरविला. नंतर आक्सफर्ड शहरांत जुरीने एक अर्ध- तास विचार करून तो काईम केला; तेव्हां जे तमासगीर जवळ होते, ते परम संतुष्ट होऊन प्रशंसा करूं लागले. .त्याचे दैवास आलें तें त्यानें मोठ्या धैर्यानें सोसलें ; आणि शेवटपर्यंत आपण निरपराधी असें ह्मणून प्राण सोडिला. या समयीं राजाचे सामर्थ्य फार वाढले. त्यानें १303 पूर्वी सांगितल्याप्रमाणे लंडन शहरचा चार्टर रद्द करून लोक जेव्हां केवळ दशरण आले तेव्हां पुनः तो चालू केला; आणि माजिस्लेट यांची नेमणूक आपले स्वाधीन करून घेतली, हे पाहून इंग्लंड देशांतील सर्व कापरेशन यांनी पुढे आपलीही अवस्था तीच होईल, हे भय मनांत आणून आपले चार्टर राजाचे स्वाधीन केले. ते परत देते समयीं राजाने त्यांपासून बहुत द्रव्य घेतलें; आणि सर्व कारभाऱ्यांची नेमणूक आपले हातांत ठेविली. राजाची सत्ता फार झाली होती; ह्मणून चतुर पुरुषांनीं विचार करून ठरविलें कीं, आतां दुःख होत आहे, तें स्वस्थ पणें सोसावें, यास दुसरी तोड नाहीं; परंतु इंग्लंड यांत कितीएक लोक असेही होते कीं, पूर्वीच्या स्वतंत्रपणाचें संरक्षण करण्यासाठी जितका प्रयत्न होईल तितका करावा, असा त्यांचा निश्चय होता. ड्युक मान्मौथ, जो राजाची मिस्त्रेस वाटर्स ह्मणून बायको होती, तीपासून झालेला मुलगा, त्याने आपले प •क्षास अर्ल माक्लस्फोल्ड, लार्ड ब्रांडन, सर गिल्बर्ट जिरार्ड,