पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

निश्चय करून चार्लस राजानें त्यांस त्यांचे जाग्यावरून आणि रोजगारांतून काढिलें, आणि जे दरबाराशीं मिळून होते त्यांस मात्र ठेविलें. धर्मपक्षी लोकांनीं लेख व भाषणे यांहींकरून आपली आस्था दाखविली. त्यांमध्ये राजाचे पक्षाचे लोक बहुत होते; जे विरुद्ध, ते मोठे धीट होते. राजा प्रथमच्यांचा पक्ष धरून त्यांत आपण मुख्य झाला; आणि प्रजापक्षांत फार दिवसपर्यंत मुख्य होते; असे जे लं- डन शहरचे लोक त्यांचा चार्टर ह्मगजे सन्द जप्त केली. मग ते फारच शरण गेले तेव्हां ती त्यांस परत दिली; आणि त्या शहरचे भाजिस्ट ह्मगजे कोतवाल यांची नेमणूक आपले हुकुमाप्रमाणेंच व्हावी असे ठरविलें. त्या नवे जातीचे राजनीतीची स्थिरता व्हावी, ह्मणून राजानें क्रूर कर्मे करून •भयप्रदर्शन करावयाचा प्रारंभ केला. फित्सहारिस याची जुरीकडून चौकशी करवून त्याचा शिरच्छेद केला. मग पूर्वीच सारे दूत, शायदी, बातमीदार, आणि लबाडी करणारे, राजा मुखत्यारीनें वा- गतो असे पाहून आपले पूर्वीचे धन्यावर फिरून बालंटें घे- ऊं लागले. राज्याचे अमात्यांनी संतुष्ट होऊन त्यास आ श्रय दिला, त्यामुळे पूर्वी क्याथोलिक लोकांचे गुन्हेगा- व्यांकरितां जशीं शासनें होत होतीं, तशी आतां प्रेस्बिती- रियन लोकांचीं होऊं लागली. पुढे पहिल्यानें स्तीफनकालेज या नांवाचे पुरुषावर आमात्यांची गैरमर्जी झाली. तो लंडन शहरांत राहा- णारा एक सुतार होता, आणि पोप मताशीं विरुद्ध आच- रण करीत असे, ह्मणून प्राटेस्तंट सुतार असें नांव पावला होता. तो हत्यारबंद होऊन पार्लमेंट सर्भेतील लंडन ८