पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७८ ते लिहिले, असे लोकांनी समजून त्यांचा तिरस्कार करावा. फित्सहारिस याने पुढे पोप याचे पक्षाचे दुसरे एक मोठें नवें बंड झाले आहे, अशी बातमी उठविली. तो बो- लिला कीं, त्या बंडांत, आणि सर एड्न्सवरी गाड़फ्रे यास मारण्यांत ड्युक यार्क यानें मुख्यत्वे प्रयत्न केला. पुढे राजानें फित्सहारिस यास बंदीत टाकिले असतां कामन्स यांनी त्याचा पक्ष घेतला. त्यांनी ठरविलें कीं, साधारण न्यायरीतीने त्याची चौकशी होऊं नये; परंतु आ पण मात्र काय करावयाचें तें करावें. लार्ड यांनी या गोष्टीस संगति दिली नाहीं. ह्मणून कामन्स यांनी आपली सत्ता प्रतिपादावयाचा उद्योग केला, आणि दोघांमध्ये क लह लागावा असा समय आला. तो होऊं देऊं नये, असा निश्चय करून राजानें पार्लमेंट सभेस जाऊन तीस निरोप दिला; आणि निश्चय केला की, पुढे दुसरे पार्लमेंट सभेस बोलावणे करावयाचें नाहीं. या रीतीनें राजा वर्तेल असे पार्लमेंट सभेचे ध्यानांत- ही नव्हते; तेव्हांपासून पुढे पार्लमेंट सभेचे कलहाची स- माप्ति झाली; आणि राजाही अतिशय स्वेच्छेनें वर्त्तं लागला. तसेच आपले दोष आणि विपत्ति यांहींकरून दुर्दशा पाव- लेले राज्याचा अधिकार आपल्यामागें भावानें चालवावा, असा बेत त्याने योजिला. याचें चित्त पूर्वी सरळ, आणि दयाळू होते, ते आतां स्वेच्छाविहारी आणि निष्ठुर होऊन गेले; त्यानें पुढे आपल्याजवळ चाहाडखोर दूत बाळगिले. आणि जे किंचित् बंडांत किंवा लवाडींत आहेत, असे दृ- ष्टीस आले, त्यांस एकंदर बंदींत टाकिलें. नंतर प्रेस्बितीरियन लोकांचा मान कमी करावा असा