पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७७ त्या समयीं कांही दिवसपर्यंत निंदचे ग्रंथ प्रसिद्ध करून परस्परांचा उपहास करावा; असें उभयपक्षी चालले होतें, या चालीवरून एक सांगावयाजोगी गोष्ट झाली ती अशी. डचेस पोर्टस्मथ या नांवाची राजाची एक राख होती, तिचेजवळ सेवेंतला फित्सहारिस ह्मणून अयर्लंड देशचा एक पोप मताचा पुरुष होता. त्याचेजवळ पूर्वी सांगित- लेले ग्रंथ तिला आणून देण्याचे काम होतें. असे असतां आपणही कांहीं तसें करावें, अशी इच्छा उत्पन्न होऊन त्यानें एवर्हार्ड या नांवाचा एके स्काटलंड देशचे पुरुषास राजा आणि ड्युक यार्क यांची निंदा लिहावयाचें काम सां- गितलें. तो एवर्हार्ड दुसरे पक्षाचा दूत होता, याकरितां त्यानेंही आपणास धरावयाची युक्ति, असे समजून तें सर्व वर्तमान सर विलियम वालर ह्मणून न्यायाधीश होता, त्यास सांगितलें, आणि तें खरें अशी त्याची खातर व्हावी; ह्मणून तो आणि दुसरे दोघे पुरुष यांस लपवून ठेवून, आपले व तो फित्सहारिस यांचे भाषण सारें ऐकविलें. त्या निंदापत्रांत बहुत द्वेषयुक्त अशी कठोर वाक्यें लि- हिलेली होतीं. वालर यानें तो बातमी राजाच्या कानावर घालून फित्सहारिस यास धरावयाचा हुकूम केला. त्या वेळेस त्याचे खिशांत त्या निंदापत्राची एक नकल होती. आपण ज्या लोकांचे हातीं सांपडलों त्यांपासून दया प्राप्त व्हावयाची नाहीं, असा निश्चय समजून त्यानें त्यांचाच पक्ष धरिला, आणि तें निंदापत्र बनाविल्याचा आरोप अमा- त्यांवर ठेविला. त्यानें अशी सबब लाविली कीं, अमात्य ते निंदापत्र प्रसिद्ध करून असे इच्छित होते की, ज्या लोकां- नीं ड्युक यार्क राजा न होण्याविषयीं यत्न केला होता, त्यांनी