पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

होता कीं, खोटी साक्षी दिली, हा गुन्हा ओट्स यावर लागू करावा; अल शाफ्स्वरी याचा प्राण घ्यावा; तसेच ड्युक मान्मौथ आणि बकिंगम व अर्ल एसेक्स आणि हालिफा- क्स यांवर असा आळ घ्यावा कीं, राजा आणि त्याचा भाऊ यांवर बंड झालें होतें, त्यांत ते सामील होते. या बातमीवरून क्यास्तिल्मेन आणि कौंटेस पोविस यांस ध रून किल्यावर टाकिलीं; आणि राजाही त्या वंडास अनु- कूळ होता, असा कितीएकांचे मनांत संशय आला. कायदा ठरवावा. त्या समयींचे कामन्स, फार प्रयत्न करीत होते कीं, राजाचा भाऊ ड्युक यार्क यानें पुढें राज्य करूं नये; असा याचा विचार पूर्वी झाला होता, परंतु केवळ नियम ठरला नव्हता. शाक्त्स्वरी व त्या पक्षांतील दुसरे मोठमोठे लोक, यांचें आणि ड्युक यार्क याचें असें वांकडें पडलें होतें कीं, याचा केवळ नाश होईल तरच त्यांचा बचाव असा प्रसंग आला होता. मान्मौथ याचे मित्रांस आशा होती कीं, जेम्स याचा अधिकार नाहींसा व्हावा, आणि आपले स्वामीस राजासन मिळावें. यार्क यास आपले मताचा अतिशयच अभिमान होता, यास्तव, आणि त्यानें स्काटलंड देशांत असतां लोकांस बहुतच पीडा दिली, ह्मणून हजारों लोक त्याचें वाईट चिंतीत अ सत. तें सेशन चालू झाल्यावर प्रथमचे आठवड्यांत ड्यु- क यार्क यास पुढील राज्याधिकारापासून बहिष्कृत होण्याचा हुकूम करावयाचा विचार ठरवायाकरितां एक कमिटी ह्मणजे मंडळी नेमिली. मग त्याविषयीं राजासमक्ष त्या मंडळींत वादविवाद बहुत झाले; शेवटीं तो हुकूम झा- ला नाहीं.