पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ र्यंत कोठे बाहेर फुटली नाहीं; या रीतीनें दया, धर्म, आणि सत्य ही नाहींशी झालीं असतां, स्नेहानें सारे राज्याचें संरक्षण झाले. तें वर्तमान असें, सर हेनरी पर्सी ह्मणून जो मुख्य बं डवाला सांगितला; त्याचा लार्ड मौंटीग्ल ह्मणून एक मित्र होता, तो लार्ड सभेचा सभासद असे, याकरितां पसीं या- च्या मनांत आले कीं, कसे तरी करून आपले मित्राचा प्राण वांचवावा. मग तो लार्ड शहरांत आल्यावर सभा व्हावयाचे पूर्वी दाहा दिवसांवर त्याचे नांवाचें कोणी एक पुरुषानें पत्र आणून दिलें, आणि तो लागलाच नाहींसा झाला. तें पत्र कोणाकडून आले ते त्यास कळेना. त्या- चा भाव असा होता, "लार्ड साहेव, या पार्लमेंट सभेस तुझी जाऊं नका; कारण, सांप्रत पातक फार होत आहे, याचें शासन करावे असा ईश्वराने आणि मनुष्यांनी संकल्प केला आहे. ही बातमी उगीच असे समजूं नका, आणि आपले घरी लवकर निघून जा, तेथें तुह्मांस समजेल कीं, ही गोष्ट होते की नाहीं. आतां कोठें कांहींच जवळ दि- सत नाहीं, परंतु राजा आणि पार्लमेंट यांचा एकदांच विध्वंस होईल, आणि तो कोण करील हे समजणार नाही. ही बुद्धि तुह्मी वाईट समजूं नये; कारण, ही ऐकिली तर तुमचें कल्याण होईल, आणि कांहीं जाणार नाहीं, हें कां ह्मणतो की, हे पत्र जाळून टाकिले ह्मणजे सर्व संकटेंगे- लीं असेंही होईल." लार्ड मौंटीग्ल तें विलक्षण पत्र पाहून विस्मित झाला, आणि घावरला. प्रथम त्यास असे वाटले की, हे कोणी तरी मला घाबरवून उपहास करायाकरितां लिहिले आहे;