पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वेळ सोडिलें, त्यावर त्याचसंबंधी पुनः कधीं कोणी फि र्याद करूं नये. • पुढे लवकरच एक बंड झाले, त्याचें नांव मील्टबाट डेंजर्फील्ड या नांवाचा एक फार लुच्चा मनुष्य, आणि पोप मताची एक सिलियर ह्मणून दाई होती, या दोघांनीं मिळून तें बंड रचिलें. त्यानें प्रथम अशी साक्षी पुरविली की, राज्य रीतीची उलट पालट करून राजा आणि त्याचें कुटुंब यांस पदच्युत करून काढून द्यावी, असा वेत चा- लला आहे. ही बातमी त्यानें प्रथम राजा आणि डयुक यार्क यां दोघांस विदित केली; त्या दोघांनी त्यास अधिक शोध लावण्याविषयीं द्रव्याचें साहित्य केलें. पुढे त्यानें कर्नल कान्सेल ह्मणून होता, त्याचे घरांत कांही लबाडीचे कागदपत्र नेऊन टाकिले; आणि जकातीकडचे शिपाई आणवून त्याचें घर शोधिवलें, तेव्हां ते सांपडले. मग सारे विषयांचा अमात्यांनी विचार करून पाहातां नजरेस आलें कीं, ते सारे कागद डेंजर्फील्ड यानें बना- विले. याकरितां त्यांनी हुकूम केला कीं, त्याचें जेथे जाणें येणें होतें, तीं सर्व ठिकाणें शोधून पाहावी. तसे करूं ला गले तो सिलियर इचे घरीं पिठाचे एके पिपांत चोरून ठेविलेले सारे कागद सांपडले. त्यावरून त्या बंडाचें नांव पडलें. या अपराधाकरितां डेंजर्फील्ड यास न्युगेट - णून बंदिशाळा आहे, तेथें पाठविलें; तेव्हां तो सारे कागद बनाविलेले असें कबूल झाला. असा तर्क होतो कीं, तें सारें कृत्य त्याचेंच; परंतु त्यानें लाविलें कीं, अर्ल क्यास्तिल्मेन, कौंटेस पोविस, आणि किल्ल्यांतले पांच लार्ड हेही त्यांत सामील होते. त्याने सांगितले की, त्या बंडाचा मतलब हा