पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७४ जेसविट लोकांचे सरदाराकडून फेन्विक ह्मणून होता, त्यानें येऊन अर्ल यास पोप पक्षाचे बक्षी तुझी, असा नि- रोप सांगितलेला मी पाहिला, हे ऐकून अर्ल याविषयीं लो- कांमध्यें गडवड झाली; लागलाच त्याजवर गुन्हा लागू हो- ऊन त्यास फांशीं द्यावें, आणि त्याचे शरीराचे तुकडे करावे असा हुकूम झाला; परंतु राजानें तें शासन शिर- च्छेदावर आणिलें. ह्या वृद्ध गृहस्थाचा शिरच्छेद किल्या- वर केला, तेथें त्याचें रूप, कर्में, आणि भाषण, यांची शांत- ता पाहून शत्रूच्याही नेत्रांत आश्रुपात आले. हें पार्लमेंट सत्रा वर्षेपर्यंत एकसारिखे बसले होते. मग दुसरी पार्लमेंट याची सभा केली. हेबियसका नांवाचा राज्य कायदा त्या सभेत झाला. तेणेंकरून प्रजा सा अगदी जुलुमांतून सुटल्या. त्या कायद्यांतली मुख्य कलमें हीं कीं, कोणास समुद्राचे पलीकडे वंदीत घालूं नये; न्या- याधीशांनी सर्व बंदिवानांस हेबियसकार्पस हुकूम द्यावा, ह्मणजे नाझर यानें बंदिवानांस कोडतांत हजीर करून त्यांस बंदीत कोणी ठेविलें, आणि कशाकरितां ठेविलें, हें वास्तवीक सांगावें. असें न्यायाधीशानें न केल्यास त्यास मोठी शिक्षा होईल. जर तुरुंग न्यायाधीशापासून वीस मैल अंतरावर असला तर बंदिवानानें हुकुमाप्रमाणें तीन दिवसांत हजीर झाले पाहिजे; आणि जर अधिक दूर असला तर त्या हिशेबानें जितके दिवस होतील, त्याचे आंत आले पाहिजे. ज्यावर फिर्याद असेल त्यावर प्रथमचें सेशन यांत आरोप ठेवावा, आणि दुसऱ्यांत त्याची चौकशी करा- वी, आणि ज्यास गुन्हा लागून झाल्यामुळे कोडताने एक