पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७३ बेरी प्रातस्तत होता, या गोष्टीपासून मोठें आश्चर्य झाले. जेसविट लोकांचा कोणीएक सरदार वैट्ब्रेड, तसेच फेन्विक, ग्यावन, टर्नर, हार्कर्ट हे जेसविट, व लांगार्न ह्मणून दुसरा कोणी पुरुष, या सर्वांची चौकशी झाली. त्यां- वर ओट्स, बेड्लो आणि डड्गेल ह्मणून एक तिसरा यांनी साक्षी दिली. या तिसऱ्या पुरुषानें विशेष गडबड व्हावयाकरितां बातमी उठविली कीं, इंग्लंड देशांतले दोन लक्ष पोप मताचे लोक युद्धाविषयीं तयारीत आहेत. सेंट ओमर्स या नांवाचे शाळेतील सोळा शायद्यांवरून त्या वंदि- वानांनी पुरावा केला की, ओट्स आपण लंडन शहरांत होतो ह्मणतो, त्या वेळेस तो ओमर्स एथें होता; परंतु तेहि पोप मताचे होते, सवव त्यांचा कोणी विश्वास धरीना. या रीतीचे त्यांनी बहुत जावसाल केले; परंतु कांहीं उपयोग झाला नाहीं. मग ते जेसविट आणि लांगार्न यांचाही घेतला, तथापि शेवटपर्यंत त्यांनी अन्याय कबूल केला नाहीं. पुढे राणीचा वैद्य सर जार्ज वेक्यान याची चौकशी झाली, तेव्हांही त्यानें नेहमी प्रमाणे साक्षी द्यावयास अंतर केलें नाहीं; परंतु त्यास सोडलें. जर त्यास शासन ठर विलें असतें, तर राणीवर गुन्हा सहज लागू झाला असता, ह्मणून असा तर्क होतो की, न्यायाधीश आणि जुरी यांस ही गोष्ट वाईट वाटली असेल. नंतर सुमारे दोन वर्षांनीं अल स्त्राफर्ड याचा या घा- तकी दुष्टांच्या योगानें प्राण गेला त्याची चौकशी या प्रका- राने झाली. ओट्स, डडगेल आणि तुबर्विल या तिघांनी त्यावर साक्षी दिल्या. ओट्स यानें शपथ घेतली कीं,