पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७० ड्युक यार्क याचा सेक्रेतारी कोल्मन, ज्याचे त्या बंडांत मुख्य अंग होते असे सांगतात, तो पहिल्यानें पळाला; परंतु दुसरे दिवशीं प्रधानांच्या स्वाधीन झाला; आणि ओ ट्स याचे आज्ञेनें त्याचे कांहीं कागद जप्त केले. अशा संशयित समयीं एक विलक्षण वर्तमान घडलें; त्यावरून लोकांच्या शंका खऱ्या, आणि ओट्स यानें सां- गितलेली बातमी वास्तवीक असे अनुभवास आलें. पोप याचे काव्याचा शोध लावण्याविषयीं त्यानें बहुत यत्न के- ला होता. असा सर एड्मन्सवरी गाड्फ्रे ह्मणून पूर्वी गृहस्थ सांगितला तो, अकस्मात् कांहीं दिवसपर्यंत नाहींसा झाला; पुढे काही दिवसांनी हांपुस्तेद प्रांताचे वाटेवर प्रि- सोहिल गांवाजवळ एके खळग्यांत त्याचें प्रेत सांपडलें. तो कशानें मेला, हें आजपर्यंत कोणास समजलें नाहीं; आणि पुढेही समजावयाचें नाहीं; परंतु सर्वांस पो मताचे लोकांचा संशय होताच, ह्मणून तें कर्म त्यांचे आंगीं लाविलें. मग समारंभ करून सत्तर धर्मपक्षी बरोबर घेऊन तें प्रेत रस्त्यांतून नेलें; तें ज्यांनी ज्यांनीं पा- हिले, त्या सर्वांचा निश्चय झाला की, तें पोप मताचे लो- कांचेच कृत्य. चांगले मोठे लोक होते, त्यांच्याही चि तांत हे अज्ञान शिरलें; आणि त्या वेळेस ओट्स यानें सांगितलेले वर्तमानाविषयों किंवा गाड्फ्रे याचे मृत्यूविषयीं कोणाचेही मनांत संशय राहिला नाहीं. तें भय सर्वत्र पसरून प्रसिद्ध व्हावें, ह्मणून पार्लमेंट सभेनेंही तें खरें वाटले असे दाखविले, आणि सर्वांस उपाय करावयाचा हुकूम झाला. त्या बंडासंबंधी जे कागदपत्र होते, ते सर्भेत आणावे. सर्वपोप मताचे लोकांनी लंडन शहरां ●