पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तो आपला चरितार्थ चालवीत होता. राजाचे जिवावरची मसलत त्यास सांगितली असतांही त्याचे चरितार्थाची व्यवस्था अशी होती की, किर्वी त्यास रोजचे रोज जेवण पुरवीत असे. त्यास दोन युक्ति सुचल्या; एक ही कीं, ही बातमी सां- गून अमात्यांची कृपा संपादावी. दुसरी, लोकांस भिववून त्यांपासून आपले कार्य साधावें. या दोहोंतून त्याने दुस- री युक्ति केली; आणि मग तो आपले दोघे सोबती घेऊन सर एड्मन्स्वरी गाड्फ्रे ह्मणून उद्योगी आणि प्रख्यात असा न्यायाधीश होता, त्याजवळ गेला; आणि त्यानें ज्या रीतीने भोळे लोकांचे मनांत भय वाटेल त्याप्रमाणे एक गोष्ट बनावून सांगितली. तो बोलिला की, राजा आणि प्रजा, पाखंडी झाल्या ह्मणून पोप याचे मनांत इंग्लंड आ णि अयर्लंड एथील सर्व राज्य आपण घ्यावे असे आहे; आणि त्याप्रमाणे त्यानें तो उद्योगही सुरू केला आहे. ज्या चार्लस राजास जेस्वट लोक ब्लाकबास्तर्ड (काळा गु- लान) ह्मणतात, त्याची त्यांनी उघड चौकशी करून तो पाखंडी असे ठरविले आहे. तें काम खचित सिद्धीस जावें, ह्मणून ग्रोव आणि पिकरिंग यांनी राजास रुप्याची गोळी घालून मारावयाचे काम पतकारिले आहे. हे संकेत सि- द्धीस गेल्यावर प्रातेस्तंट धर्म नाहींसा करावा, असा करार करून घेऊन ड्युक यार्क यास राज्यपद द्यावें; व त्यानें न घेतले तर त्याचाही नाश करावा, असे ठरले आहे. , जरी ही बातमी उघड खोटी होती. यावर लोकांची प्रीति बसली. तरी ओट्स त्यानें सांगितलेले जेस- विट लोकांतून बहुतांस धरून लागलेच बंदीस टाकिलें.