पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तून निघून जावें. दरवारांत कोणी परकी पुरुषानें येऊं नये, वेस्तमिन्स्तर आणि लंडन एथील फौज तयारीत असावी, आणि ओट्स याचें रक्षण करावें. अशी पार्लमेंट सभेनें राजास विनंती केली; त्यावरून ओट्स यास वैट्- हाल वाड्यांत राहावयास जागा दिली, आणि सालाबाद बाराशे पौंड नेमणूक करून देऊन नव्या अशा खोट्या बातम्या उठवावयाविषयीं हुशारी आणिली. या रीतीची ओट्स याची वढती झाली, ह्मणून दुसरे- ही कितीएक ठकबाजी करून द्रव्य मिळवू लागले. विलीयम बेड्लो ह्मणून त्यापेक्षांही लुच्चा असा एक पुरुष होता, तो पुढे प्रसिद्धीस आला. ओट्स या सारिखाच तो नीच कुळांतला होता, आणि कितीएक लवाड्या व चोऱ्या यांत धरला गेला होता. त्याचे इच्छेने त्यास विस्तल शहरांत धरून लंडन शहरांत आणिलें, तेथे त्यानें अमात्यांपुढे सां- गितलें कीं, मी राणी जेथे राहते, त्या सामर्सेट वाड्यांत सर एड्मन्स्बरी गाड्के याचे प्रेत पाहिले, आणि लार्ड बे- लासिस याचे चाकरानें मला सांगितलें कीं, जर तूं हें येथून काढशील तर तुला चार हजार पौंड देऊ. ती बातमी लोकांनी मोठे उत्साहानें श्रवण केली, हे पाहून ओट्स याची बातमी त्यानें खरी ह्मणून वनावून सांगितली. रीतीनें सर्व लोक आपल्यास अनुकूळ बोलतात, असे पाहून जे शायदी अझूनपर्यंत बातम्या मात्र नुसत्या उठवीत होते, त्यांनी थोडासा अधिक धीर करून राणीवर कांहीं अन्या- या याचा आरोप ठेविला. कामन्स यांनी राजास त्या वेळीं एक अर्जी देऊन तो आरोप खरा असा कांहीं आपला भर