पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६८ होता, त्याजवळ पाठविलें; तेथें तो बोलला की, माझे दा- राखालीं हे कागद येऊन पडले होते; आणि पुढे त्यानें सांगितले की, त्यांचा कर्ता मला ठाऊक आहे; परंतु जेस्विट लोकांपासून आपणास उपद्रव होईल, हें भय म नांत आणून त्याने आपले नांव गुप्त राखावें, अशी माझी प्रार्थना केली आहे. ही बातमी लागली; परंतु तीपासून कांहीं खचीत न समजतां उगीच शंका मात्र उत्पन्न झाली; ह्मणून राजानें ठरविलें कीं, ही सारी उगीच बडबड आहे. तथापि टंग यानें पुनः प्रधानाजवळ जाऊन सांगितले की, त्या रात्रीस बंडसंबंधी जेस्विट लोकांपासून एक कागदांचा पुडका विड्सर गांवास पाठवायाकरितां डांकखान्यांत येणार आहे. व्यावर ड्युक यार्क याचा धर्मोपदेशक बेडिंगफील्ड याचें नांव लिहिले आहे. ती पत्रे पूर्वी कांहीं घटिका ड्युक यार्क यास पोंचली होती; परंतु तीं खोटी आणि त्यांचा आप- ल्यास कांहीं अर्थ समजत नाहीं, ह्मणून तीं त्याने राजास दाखविली होतीं. या सर्व भयंकर बातमीचे मूळ टैटस ओट्स, या नां- वाचा पुरुष होता. त्यास पुढे लवकरच सरकारांत आ णिलें. तेव्हां तो प्रथम अनमान दाखवून शायदीस उभा राहिला. हा टैटस ओट्स कोणीएक नीच दुष्ट, दांड- गा, भिकारी असा पुरुष होता. एकदां त्यावर खोटे शप- तेचा आरोप आला होता; पुढे तो एके लढाऊ गलबतांत धर्मोपदेशक होता, परंतु तेथून कांहीं व्यसनामुळे त्यास काढिले. मग तो रोमन क्याथोलिक वेष धरून सेंट ओमर्स् शहरास गेला, तेथे इंग्रेजी शाळेत कांहीं दिवस