पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सिद्ध आणि साधित या दोन प्रकारच्या गुणाची कमती नव्हती; परंतु त्याचे भाषण मधूर नव्हतें, आणि समज वा- स्तवीक नव्हता; आणि तो लोभी, आग्रही व दांडगा असे. अशा पांच पुरुषांजवळ चार्लस राजाने आपला संपूर्ण कारभार स्वाधीन केला; त्यांनी पुढे राज्या- ची अतिशय दुर्दशा करून फार नाश केला. इ०स० १६७० या अशुभ मंडळीमुळे लोक सरकारचा अतिशय द्वेष करूं लागले; व ते आपली भये आणि असंतोष निर्भयपणे सांगू लागले. पुढे पोप याचे मताचा राज्यासनावर बसेल, दरबारी लोक वाईट, आणि जें पार्लभेंट सतरा वर्षेपर्यंत बसलें तें काम चालवील, हे पाहून लोकांची मनें व्यग्र तें आणि भयभीत झालीं. मग कांहीतरी विषय यावा, आणि त्यांचा क्रोधाग्नि प्रदीप्त व्हावा, इतकें बाकी राहिलें. आगस्ट महिन्याचे १२ वे तारिखेस राजा उपवनांत फिरत असतां, किवीं ह्मणून एक रसायणी होता, तो त्यास ह्मणाला, "साहेब, कोणीतरी आपले बरोबर असावा; आ- पले शत्रूंनी जिवावरची मसलत केली आहे; आणि कदा- चित् तुह्मी आतां फिरत आहां एथेंच तुह्मास गोळी लागेल." अशी तो विचित्र गोष्ट बोलला, त्यास पुरशिस केली; तेव्हां तो ह्मणाला की, डाक्तर टंग ह्मणून एक धर्मपक्षी आहे, त्याने मला सांगितलें कीं, ग्रोब आणि पिकरिंग या नांवाचे दोघे पुरुषांनीं राजास मारावयाचा उद्योग आरंभिला आहे; आणि राणीचा वैद्य सर जार्ज वेक्मन यानें विषप्रयोग करून तेच काम पतका आहे. या रचलेले बंडासंबं धी कागदांचा एक पुडका घेऊन टंग यास राजाजवळ नेलें; तेथून त्यास चौकशीकरितां डान्वी ह्मणून प्रधान