पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आपल्यास झाला, असे त्या वेळेस त्यांस वाटले; परंतु ज्या अन्यायाकरितां युद्ध केले होते, त्याचे निवारण तहापासून झाले नाहीं. मुख्यत्वेंकरून लार्ड कारेंडन यानें प्रथम ती व्यर्थ लढाई करावी, अशी राजास मसलत सांगितली, आणि शेवटी आपणच बेअवरूचा तह करून संपविली, ह्मणून त्यावर ठपका आला. त्यावर फार दिवसपर्यंत रा जाची गैरमर्जी झाली होती, आणि लोकांस तरी त्याचें वि शेष अगत्य होतें असें नाहीं; ही त्याचे शत्रूस आंत प्रवेश . करून त्याचा संपूर्ण नाश करावयास संधी सांपडली. मग मिस्तर सेमोर होता, त्यानें कामन्स सभेमध्ये त्याजवर सत्रा कलमांचा आरोप ठेविला. तीं कलमें खरी नव्हतीं, तथापि सामर्थ्य आणि लोकांचे मत हीं एकत्र झाली असें पाहून, क्लारेंडन आपले खुशीनें काम सोडून फ्रान्स देशास निघून गेला. या त्या गुणी अमात्यापासून या रीतीने सुटका झाल्यावर राजानें कितीएक मनुष्यांवर सर्व विश्वास टाकिला. लोकांस नांवाच्या पहिले वर्गावरून केबाल असें ह्मणत अ- सत. त्यांत पहिला सर टामस क्लिफर्ड. तो मोठा शूर उतावीळ असून वक्ता, आणि कावेबाज असे, ह्मणून सर्वांस अतिशय भयंकर झाला होता. दुसरा लार्ड आश्ली, ज्यास पुढे लार्ड शाफट्स्वरी असा किताब मिळाला होता. तो दुष्ट, लोभी, आणि साहसी असा होता. तिसरा ड्यूक बकिंगम, तो हास्यमुख, स्वच्छंदी, कांहींसा चतुर आणि मोठा चपळ होता. चवथा आलिंग्तन, त्याची बुद्धि मध्यम व निश्चय चांगला असे; परंतु तो सिद्धीस न्यावयाजोगी त्यामध्ये हिंमत नव्हती. पांचवा ड्यूक लाडर्डेल, यामध्यें