पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ जी भिंत होती तोपर्यंत खणून दुसरे बाजूस पोहोचले, तेव्हां तेथें आंत पोखरून कोळसे भरून ठेविले आहेत असे त्यांनीं पाहिले, ह्मणून ते खिन्न झाले; परंतु त्यांस बातमी समज- ली कीं, ते कोळसे विकायाचे आहेत, आणि जो अधिक किंमत देईल त्यास ते देणार, ती संधि साधून त्यांनीं ती जा- गा भाड्याने घेतली, आणि बाकीचे कोळसेही कांहीं का- मास पाहिजेत असे निमित्त करून घेतले. पुढे त्यांनी दा रूचीं छत्तीस पिंपें हालंड यांत विकत घेऊन तेथें नेलीं, आणि ती कोळसे व काटक्या यांनी आच्छादिलीं. तें झा- ल्यावर त्या गुहेचे दरवाजे उघडे टाकले, आणि जो आंत जाईल त्यास जाऊं देऊ लागले; जसे की त्यांत कांहींच गुप्त नाहीं. आपली खचित फत्ते होते, अशी खातर बाळगून त्यांनी आपला वेत पुढे चालविला. त्या पार्लमेंट सभेस राजा, राणी, आणि राजाचा वडील मुलगा हेनरी, ही सर्व याव- याचीं होतीं. राजाचा दुसरा मुलगा फार लहान ह्मणून येणार नव्हता; याकरितां असा वेत केला की, पर्सी यानें व्यास धरून ठार मारावें, आणि राजाची मुलगी इलिझाबेथ ती वार्विक प्रांतांत लार्ड हारिंग्तन याचे घरी होती, ति ला सर इवरर्ड डिग्बी यानें धरून लागलाच राज्याभिषेक करावा. नंतर पार्लमेंट याचे सभेचा दिवस जवळ आला. वंड इतकें गुप्त राहून कधीं असा विनाशाचा वेळ आला नसेल. बंडवाले केव्हां तो वेळ येतो अशी वाट पहात होते, आणि मनांत संतुष्ट होते कीं, आमचा बेत तडीस गेला. ती गुह्य गोष्ट सुमारें वीस आसामींस कळली असतांही दीड वर्षप-