पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जास वीस लक्षांची नेमणूक करून घ्यावयाचा उद्योग आ- रंभिला; तो सिद्धीस गेला असता तर राजा स्वतंत्र झाला असता; परंतु क्लारेंडन ह्मणून मोठा प्रसिद्ध गृहस्थ होता, त्यानें तें चालू दिलें नाहीं. तो राजाच्या पक्षाचा असे खरा; परंतु स्वतंत्रता, आणि नीति यांचा अभिमान फार बाळगीत असे. या दोन प्रकारच्या मसलतीविषयीं राजा कांहींच मनांत आणीत नसे; त्याला पैका मात्र पाहिजे होता. तो नेहमी खर्चाचे पेचांत असे. ह्मणून त्याच्या मनांत कितीएक गोष्टी नव्हत्या, त्याही त्याचे हातानें घडल्या. त्यांतही एक झाली कीं, पोर्तुगल देशची राजकन्या क्या- थेरिन होती तिशी लग्न केलें. ती गुणी होती खरी, परंतु सुंदर नव्हती. तिचे बरोबरचे आंदणाची त्यास फार लालूच होती. तें आंदण तीन लाख पौंड होतें, आणि खेरीज आफ्रिका देशामध्ये तांजियर आणि हिंदुस्थानांत मुंबई हे दोन किले होते. चान्सेलर कारेंडन, सौधां- मन आणि डयूक आर्मंड यांनी तिशी लग्न करूं नये, ह्म- णून राजास अनेक गोष्टी सांगितल्या; त्यांत हेंही कळ- विलें कीं, तिला मुले कधी व्हावयाचीं नाहींत; परंतु राजानें त्यांची मसलत न ऐकून तिशीं तें अशुभ लम केलें. दुस- रा त्यानें असा विचार केला कीं, डच लोकांशी आपण लढाईची प्रतिज्ञा करावी; आणि पैका हातीं येईल तेणेंक- रून आनंद भोगावा. पुढे ती समुद्रांतली लढाई चालू झाली, तीत पुष्कळ रक्त पडलें, आणि पैका खर्च झाला. शेवटीं ब्रीडा शहरामध्यें तह ठरविला, त्याप्रमाणे न्यूयार्क प्रांत डच लोकांनी इंग्लिश यांस दिला. तो मोठा लाभ 4