पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नंदाने राहावयाचा त्यास अभ्यास होता, त्याप्रमाणेच तो स्वभाव त्याने सिंहासनावरही राखिला. त्याचा स्वभाव ख्यालीखुशाली ह्मणून तो पूर्वीचा सूड उगवील, ही को- णाचे मनांत शंकाही नव्हती. याप्रमाणे सर्व बरेंच दिसलें खरें; परंतु त्याचा परिणाम विपरीत झाला. आळस आणि विषयेच्छा यांहींकरून तो कोणत्या राज्यकामाच्या उपयोगी नाहींसा झाला; बरें आणि वाईट या दोन्ही लोकांशीं सा- रिखी मैत्री ठेवूं लागला; आपले पूर्वीच्या मित्रांचा समा चार घेईना; आणि शत्रूच्या पारिपत्याविषयीही उद्योग करीना. राजास मारण्याचे उद्योगांत जे होते, त्यांशिवाय सर्वांस माफी द्यावयाचा हुकूम पार्लमेंट सभेनें केला. काम्बेल, अ- यर्टन, आणि ब्राड्शा हे तिघे मेले होते, तरी शासन क रावयास योग्य असा विचार करून त्यांची प्रेतें खणून का ढिलीं, शिरच्छेदाचे ठिकाणी नेलीं, आणि कांही वेळपर्यंत लोंबवून शेवटी त्या लाकडा खालींच पुरून ठेविलीं. बाकीचे जे चार्लस राजाचा न्याय करावयास बसले होते. त्यांतून कितीएक मेले; आणि कितीएकांस क्षमा मिळाली. ऐशींतून दाहांस मात्र लागलेच ठार मारिलें. ते आग्रही होते; आणि आपण करितों हैं चांगले असे त्यांस वाटत असे. त्यांवर चहूकडून प्रसंग आला, त्या वेळेस त्यांनी मोठे धैर्य दाखविलें, ते एखादे चांगले कामांत अस ते, तर त्यांची कीर्ति होती. या प्रसंगी राजानें अगदीं पार्लमेंट सभेची गरज नाहीं अर्से केले असतां सिद्धीस जाईल, असे पाहून, त्याचा एक मंत्री सौथांष्टन ह्मणून होता, त्याने कामन्स यांपासून रा-