पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६३ मोठ्या स्वरानें स्तव करण्यांत प्रवृत्त झाले. मग ग्रान्विल यास आंत बोलावून राजाचे पत्र मोठ्या हर्षानें वाचलें तें संपल्यावर एक क्षणही मध्ये न जातां, सर्व सभासदांनी ए- कदांच राजाची विनंती मान्य केली; आणि तो उत्साह सर्वत्र प्रसिद्ध व्हावयाकरितां असे ठरविलें कीं, तो कागद आणि माफीपत्र ही लागलींच छापून प्रसिद्ध करावीं. द्वितीय चार्लस राजा मे महिन्याचे एकुणतिसावे ता- रिखेस लंडन शहरांत आला, तो त्याचा जन्मदिवस हो- ता, त्या वेळेस जेथे जेथें तो गेला तेथें तेथें असंख्य लोकांचा समूह त्याचे बरोबर जाऊन त्याचा जयजयकार करूं ला- गले. बहुत दिवसपर्यंत आंतले आंत तंटा लागून पक्ष झाले होते; आणि एकापुढे एक दुष्ट राजे होऊं लागले, त्यामुळे लोकांस या प्रसंगी हर्ष झाला तो मावेना. पाहिले की, आपली पूर्वीची राज्यनीती लयास चालिली होती, ती पुनः उदयास आली. त्यांनीं प्रकरण ३०. द्वितीय चार्लस राजाची कथा. संन् १६६० पासून १६८५ पर्यंत. चार्लस राजा राज्य करूं लागला तेव्हां त्याचे वय तीस वर्षांचें, स्वरूप सुंदर, भाषण सभ्य, आणि स्वभाव मनो- रंजक, असे त्यांमध्ये गुण होते. प्रथमचे आचरणावरून त्यास लोक फार वश होतील, असा सुमार दिसत होता. तो परदेशांत होता त्या वेळेस आपले दरवारी येत आ- भ्रंथ संग्रह