पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६२ - वर्तमान असें, - डेवन प्रांतांत मारैस या नांवाचा एक विद्वान गृहस्थ होता, त्याशी मात्र तो राजाचें पुनः स्थापन करावयाची मोठी मसलत करीत असे. सर जान ग्रा- न्विल ह्मणून एक राजापासून कांहीं कामगिरी करितां गृहस्थ आला होता, त्यास मांक याने दोन वेळ सांगून पा- ठविलें कीं, तुझी मारैस यास आपला मजकूर समजवावा. तो ह्मणूं लागला कीं, मी जनरल यावांचून दुसरे कोणास निरोप सांगावयाचा नाहीं. याकरितां मांक याने याचे मनुष्यपणावर लक्ष्य देऊन त्यास आपले मनांतले सर्व सां गितलें ; तथापि त्यानें त्याविषयी कागदास टांक लाविला नाहीं. ही बातमी ग्रान्विल याचे द्वारे राजास स्पानिश मुलुखांत समजली; तेथें ब्रीडा शहरचे अमलदाराने त्यास सत्कार करावयाच्या निमित्तानें अडकवून ठेविलें होतें. त्या- पासून तो मोठ्या युक्तीनें निघाला, आणि हालंड देशांत येऊन निरोपाची वाट पाहात राहिला. फार दिवस स्वतंत्र पार्लमेंट सभा व्हावयाच्या दिवसाक- रितां लोक वाट पाहात होते, तो शेवटीं आला. सर्वांची प्रीति राजावर वसली, तथापि स्पष्ट बोलावयास इतके त्या वेळेस भय होतें कीं, राजाचें नांव घ्यावयास कांहीं दिवस- पर्यंत कोणास हिंमत होईना. मांक मुळापासून स्वस्थपणे त्यांची परीक्षा पाहात होता; शेवटीं निश्चय करून आने- स्ली ह्मणून अमात्यांत मुख्य होता; त्यास अमात्यांला कळ- वावयाकरितां सांगितले कीं, सर जान ग्रान्विल राजाक- डचें बोलणें बोलावयाकरितां पत्र घेऊन दरवाजाचे बाहेर आला आहे. हा निरोप ऐकून सर्वांस फारच संतोष झा- ला. सभासद क्षगभर आपली मान्यता विसरून त्याचा