पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्यास स्त्र या समयीं जनरल मांक ह्मणून एक सरदार आठ हजार लोक घेऊन स्काटलंड देशांत होता. देश संकटांतून मुक्त करीन ही आशाही नव्हती. आप- ला वेत काय आहे, हे त्यानें अतिशयच गुप्त राखिलें होतें. राजधानीत बखेडा झाला होता, त्याची चौकशी करावया- करितां त्यानें आपलें सैन्य किंचित् उद्योगास लावतांच, सर्व विरुद्ध पक्षाचे लोक त्याचें अंग आपलेकडे असावे, असे इच्छू लागले. तथापि तो लंडन शहराजवळ जवळ येत चालिला. तो कशाकरितां येतो, हा तेथें सर्वांस संशय पडला; आणि कांहींच बातमी बाहेर फुटेना; ह्मणून आ- श्वर्य झाले; परंतु मांक तसेच मौन धरून शेवटी लंडन शहराजवळ कांहीं कोशांवर सेंट आव्लान्स गांव आहे तेथे आला. त्या वेळेस रंग पार्लमेंट पुनः एकत्र जमलें होतें, त्यास त्याने तेथून निरोप सांगून पाठविला की, लंडन शहरांत जी फौज आहे, ती खेडे गांवांस पाठवावी. नंतर राज्यांस उपयोगी असा बंदोबस्त करून कामन्स यांनी स्वेच्छेनें सभा बंद केली, आणि हुकूम केला कीं, लागलीच नवें पार्लमेंट याची सभा करावी. 1 इ०स० या वर्षापर्यंत नवी पार्लमेंट सभा बसली नाहीं. आणि जनरल याचे मनांतला वेत कोणासही १६६० कळला नाहीं. पुढेही त्यानें तसेंच गौप्य राखिलें. जरी सर्वांस ठाऊक होतें कीं, नवें पार्लमेंट याची सभा करणें ( लणजे राजास पुनः पदावर बसविणें) असा अर्थ होतो, तथा. पि त्याने ती गोष्ट तोंडांतून कधीही काढली नाहीं. शेव- टीं विश्वासाने मात्र कायतें त्याचें हृद्गत प्रसिद्ध झाले. तें P