पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आणि त्यांत मोठमोठे होते, त्यांनी फ्लीवुड याचे घरीं सभा केली. त्यांचे विचाराचा इत्यर्थ हा ठरला कीं, ज्या- वर सर्वांचा विश्वास बसेल, त्यास सैन्याचा सरदारपणा द्यावा; आणि असा पुरुष रिचर्ड नव्हे हे स्पष्ट ध्यानांत आले. रिचर्ड यास जें पद मिळाले, तें राखावयाजोगा त्याच्या- मध्ये धीर नव्हता; ह्मणून तो स्वेच्छेने आपले स्थळ सो- डून कांहीं वर्षेपर्यंत परदेशात गेला. नंतर परत स्वदेशीं येऊन आपले मुळचे वतनांवर राहिला. या रीतीनें सैन्याचे सरदार पुनः एकवेळ स्वतंत्र झा- ल्यावर त्यांनीं निश्चय केला की, ज्या पार्लमेंट सभेनें चा- र्लस राजाचा शिरच्छेद केला, आणि जी कावेल यानें काढून टाकली होती, तिला पुनः बोलावणे करावें. ती पुनः एकत्र जमल्यावर तिला ज्यांच्या योगानें स्वस्थान प्राप्त झाले होते, त्याचीच सत्ता कमी करावयाचे उद्योगास ला. गली. ह्मणून सरदारांनी पुनः एक वेळ निश्चय केला की, ज्या पार्लमेंट सभेपासून आपणासच उपद्रव होतो, तीस नि- रोप द्यावा. असा बेत करून जनरल लांबर्ट ह्मणून सर- दार होता, तो एक निवडक फौजेची टोळी घेऊन वेस्त मिन्स्तर वाड्याचे वाटेवर जाऊन राहिला. इतक्यांत पा र्लमेंट सभेतील मुख्य लेंथाल रथांत बसून सभेस चालि- ला होता; त्याचे घोडे उलटवून यास युक्तीचे वाटेनें घरों नेऊन पोहोचविलें. असेंच सर्व सभासदांत मागें फिरवून सैन्याने आपले स्थानीं जाऊन त्या दिवशी उपास केला. " त्या वेळेस अशी चाल होती कीं, कांहीं तरी घोर कर्म क र झाले ह्मणजे त्याचे पूर्वी किंवा नंतर एक उपोषण करावें.