पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५९ केला ह्मणून त्याची फार निंदा केली. प्रतिघटकेस त्यास कांहीं नवें दुःख प्राप्त होऊं लागले. लार्ड फेफक्स, सर उइलियम वालर, आणि दुसरे प्रेस्बितरियन मताचे कितीएक मुख्य, यांनी त्याचा जीव घ्यावयाची आंतून मसलत आरंभिली. त्याच्या कारभारांत स्वदेशी आणि बाहेर बहुतच खर्च झाला, ह्मणून त्यास कर्ज अतिशय झालें. एक वंड फुटून तें मोडले ह्मणजे दुसरे उत्पन्न व्हावे, असें होत चालिलें; त- शांत त्याच्या बुद्धीस निश्चय झाला कीं, आपण मेलों अस- तां प्रजांस परम हर्ष होईल. कर्नल तैनस ह्मणून एक गृहस्त होता, त्यास पूर्वी त्याचे पक्षाचा फार अभिमान होता; त्यानें एक पुस्तक करून प्रसिद्ध केले, त्याचें नांव, “जीव घेण्यांत पाप नाहीं.” ते पुस्तक फार चांगले केलें होतें, पाहून मरणाचे भयानें काम्वेल यास कधीही हसे आ- लें नाहीं. या रीतीनें तो साशंक आणि भयभीत होऊन एकांती किंवा मंडळींत दुःखी असा दिसत असे. तें शेवटी त्यास फार ताप येऊन त्याची शुद्धी गेली. त्या- चे इतकें मात्र राहिलें कीं, तुमचे मागें तुमचा पुत्र रिचर्ड यानें राज्य करावें की काय? असे पुसलें असतां, तो होय ह्मणे. सप्तंबर महिन्याचा तिसरा दिवस त्यास नेहमी मोठा शुभदायक असे, त्याच दिवशी त्यास मृत्यु आला. त्या वेळेस त्याचें वय एकुणसाठ वर्षांचे होते. त्याने नऊ वर्षेपर्यंत राज्याचा अपहार केला. क्राम्वेल मेल्यानंतर पुढे त्याच्या स्थळी कोण नेभावा, याविषयीं आंतले आंत बखेडा पडला; परंतु त्याच्या मा- गेंही धाक होता, त्यामुळे त्याचा मुलगा रिचर्ड यास त्या स्थळीं नेमून प्रसिद्ध केलें. अशा मुख्यास सैन्य कंटाळलें;