पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५८ आणि विनाब्लस हे चार हजार पायदळ घेऊन गेले हो- ते. तो त्यांचा उद्योग सिद्धीस गेला नाहीं, आणि स्पा- नियार्ड लोकांनी त्यांस तेथून काढून टाकिलें. मग ते जामइक बेटास गेले, तें बेट कांहीं प्रयत्नावांचून त्यांस साध्य झाले; परंतु त्या वेळेस हें कांहींच नव्हे. वाटून मुख्य काम तडीस गेलें नाहीं, याकरितां पेन आणि विनाव्ल्स हे येतांच यांस किल्ल्यावर टाकिलें. असे क्राम्बेल यासही तो समय कठीण आला होता. त्या वेळेस प्रजा त्यास सन्मानपत्रे आणि स्तुतियां- हींकरून उत्साहित करीत होत्या, तथापि त्यास मोठा पेंच येऊन पडला होता. तो असा, - तो सर्व प क्षाचे लोकांशी वांकडा झाला, आणि त्यामध्ये परस्परें वैर- भाव होता; ह्मणून तो निर्भयपणानें कांहीं दिवस राहिला होता. पुढे त्याची ठकबाजीची विद्या सरली, त्यास को- णी ठकला जाईना, आणि त्याच्या पक्षाचे होते, तेही त्यानें एक ह्मणून भलतेंच केले असे पाहून कंटाळले. कारभाराचा सारे राज्यास कंटाळा आला होता. घरांत जर त्यास सुख असते, तर त्याची फारच फजीती झाली नसती; परंतु त्याचा जांवई फ्लीवुड नामें होता. तोही आपला सासरा धर्माच्या मिषेकरून इहलोकसंबंधी सुख साधितो, असे पाहून द्वेष करूं लागला. फुलीवुड याची बायको, त्याची वडील मुलगी, तिला सर्वसत्ताक रा ज्याचा असा पक्ष होता की, बापही राजा नसावा, असें तिचें मनांत होतें. याच्या दुसऱ्या मुलींस राजाचा पक्ष दृढ होता; आणि मिस्त्रेस क्लेपोल ह्मणून त्याचे प्रीतींत- ली मुलगी होती, तिनें तो मरते वेळेस राजासनाचा अपहार इ०स० १६५८ त्याच्या तथापि