पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तो मेदितरेनियन समुद्रास गेला, तेथें पुण्ययुद्धाचे दिव- सांपासून इंग्लिश लोकांचें एकही गलबत गेले नव्हते. तिकडे त्यास ज्यांनीं प्रतिबंध केला, त्या सर्वांचा गर्व त्यानें हरण केला. लेगार्न शहराजवळ त्यानें नांगर टाकिला, आणि तेथच्या तस्कनी प्रांताचा ड्यूक यापासून इंग्लिश लोकांचे व्यापाराची कांहीं खराबी झाली होती, तिचा ज बाव पुसून घेतला. तेथून तो आल्जियर्स प्रांतांत गेला, आणि तेथील लोक चांचेपणा करून इंग्लिश यांस उपद्रव करीत असत, तो बंद केला; आणि तेथील सरदारांशी तह केला. मग तो त्युनिस शहरास गेला, आणि तेथी- ल सरदाराने त्याचा अपमान केला; ह्मणून ब्लेक बंदरांत जाऊन सगळीं गलबतें जाळून पुढे गेला. केदि शह- त्यु पावला. रांत त्यानें वीस लाख रिवाल या नांवाचें नाणे भरलेलीं अशीं दोन गलवतें घेतलीं. नंतर क्यानारीझ बेटाजवळ स्पानिश लोकांची सोळा गलबतें जाळून, आपले पराक्रमा- ची कीर्ति भोगावयाकरितां स्वदेशीं येत असतां वाटेनें मृ या र पुरुषानें अपहारकाकरितां युद्धे के- लीं खरी; परंतु त्याचे पक्षाचा त्यास अगदी अभिमान न व्हता; त्याचें मन सर्वसत्ताक राज्याकडे होते. याचा उद्योग दुष्ट राज्याचें प्राचल्य करण्याकरितां नव्हता, तर आपला देश संकटापासून मुक्त करावयाकरितां तो खला- शांस ह्मणत असे, "कोणाचे हाती राज्य गेले तरी आ- पण स्वदेशाकरितां युद्ध करावें, हा आपला धर्मच होय." ब्लेक याचा उद्योग पूर्वी सांगितल्याप्रमाणें चालिला असतां, हिस्यानिओला ह्मणून अमेरिका देशांत वेट आहे, त्यावर हल्ला करावयाकरितां दोघे नौकाध्यक्ष पेन